You are currently viewing आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात…

आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात…

आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात…

जिल्हा प्रशासनाकडे राजेंद्र पेडणेकर यांची मागणी..

कणकवली

पावसाळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्तींच्या घटना घडतात. यंदाच्या पावसाळ्यात या घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजाना कराव्यात, अशी मागणी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पावसाळा सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात दरड कोसळणे, पूर येणे, झाडे पडणे, विद्युत पोल व विद्युत तारा तुटणे यासह अन्य आपत्तीच्या घटना घडतात. या घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरड दुर्घटना टाळण्यासाठी संभाव्य दरड प्रवण ठिकाणांची संबंधित यंत्रणेने पहाणी करुन उपाययोजना करणे गरजेचे आहे. वर्षा पर्यटनासाठी पर्यटक जिल्ह्यात येतात. पर्यटाकांना पर्यटन स्थळी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून पर्यटन स्थळापर्यंत जाणारे मार्ग सुरक्षित असणे महत्वाचे आहे.
जिल्ह्यात येणारे घाट मार्ग, रेल्वे रुळांच्या आसपासचे संवेदनशील डोंगर टेकड्या, दुर्गम भागातील विविध वस्ती वाड्यांतील दरड कोसळायचे धोके असलेली ठिकाणे पावसाळ्या पूर्वीच हेरून तिथे दरड कोसळून ये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपत्ती ओढवल्यानंतर मदत कार्यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा