You are currently viewing रविवारी गट ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

रविवारी गट ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

रविवारी गट ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही रविवार दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ व कणकवली तालुक्यातील पुढील 5 उपकेंद्रावर (प्रत्यक्ष परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12. वा. वेळेत) घेण्यात येणार असून, या परीक्षेसाठी एकूण 1836 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीप्रमाणे कुडाळ व कणकवली तालुक्यातील पुढील 5 उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे. अशी माहिती मच्छिंद्र सुकटे निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली आहे.

उपकेंद्राचे नांव – 1)  कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्युनिअर कॉलेज, कुडाळ येथे बैठक क्रमांक KD001001 ते KD001432. 2) संत राऊळ महाराज महाविदयालय, कुडाळ येथे बैठक क्रमांक KD002001 ते KD002360. 3) कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ इंग्लिश मेडियम सेकंडरी स्कूल, कुडाळ येथे बैठक क्रमांक KD003001 ते KD003264.  4)  कणकवली कॉलेज, कणकवली येथे बैठक क्रमांक KD004001 KD004432 तर 5) विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला, कणकवली येथे बैठक क्रमांक KD005001 से KD005348 असा आहे.

सदर परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना:- आयोगामार्फत आयोजित परीक्षांमध्ये कॉपीचा/गैरप्रकाराचा प्रयत्न करणा-या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेतली जाणार आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचा-यांकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक व भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वतः पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा