You are currently viewing इन्सुली-डोबाची शेळ येथे चोरी, दोन बंगले फोडले…

इन्सुली-डोबाची शेळ येथे चोरी, दोन बंगले फोडले…

बांदा

इन्सुली-डोबाची शेळ येथील दोन बंद बंगले अज्ञातांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही बंगल्यांचे मालक मुंबईत असल्याचे समजते. शेतात काम करणार्‍या स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. स्थानिकांनी ही माहिती बांदा पोलीसांना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्‍यां समवेत घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. प्रथमदर्शनी एका घरातील टीव्ही चोरीस गेल्याचे समजते. चोरटे स्थानिकच असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली. बांदा पोलीसांत रीतसर फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा