You are currently viewing ।।श्री राम जय राम जय जय राम ।।

।।श्री राम जय राम जय जय राम ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।श्री राम जय राम जय जय राम ।।

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचारितावली काव्यपुष्प-७९ वे

—————————————–जे करी ते करी श्रीराम । कर्ता असे हा राम । गाभा हाच श्रीराम । असे महाराजांच्या उपदेशाचा ।। १ ।।

 

महत्वाचे -पुण्याचे । कार्य गो रक्षणाचे । महत्व गो-धनाचे।

दाखवुनी देती श्रीमहाराज ।। २ ।।

 

बताशा घोडा, गंगी गाय, कुत्रे, ही प्राणी सारी । प्राणी-मात्रांविषयी प्रेम भारी । गो शाळेत पाहुनी सारी ।

भरते प्रेमाचे येई श्रीमहाराजांना ।। ३ ।।

 

भगवंताचे नाम घ्यावे । नाम घेणे कधी ना सोडावे ।

व्यवहारात व्यर्थ ना गुंतावे । रामनाम युक्ती त्यासाठी ।। ४ ।।

 

जेकब नावाच्या गृहस्थाने प्रयत्न केले । माणसांना पाठवले।

त्यातील एकाने काम केले । अन्नातून विष त्याने खाऊ घेतले । श्रीमहाराजांना । ५ ।।

 

श्रीमहाराजांना याचा त्रास झाला । लोकांनी दीनवाणे होऊन

पाहिला । अखेर त्रास कमी झाला । श्रीराम कृपेने ।। ६ ।।

 

हा प्रसंग घडला । तेव्हापासून दम्याचा त्रास सुरू झाला।

शेवटपर्यंत तो सोबत राहिला । श्रीमहाराजांच्या ।। ७ ।।

******

क्रमशः करी लेखन हे कवी अरुणदास

———————————— —

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचारितावली काव्यपुष्प-७९ वे

-अरुण वि.देशपांडे-पुणे

—————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा