You are currently viewing मंगलाष्टके

मंगलाष्टके

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सहाय्यक जनसंपर्क अधिकारी लेखिका कवयित्री वैशाली पडवळ लिखित अप्रतिम रचना*

 

*मंगलाष्टके*

______________________

 

निमंत्रण तुज गणेशा श्रद्धेने

प्रकट हो मंडपी आता त्वरेने

घडावा कार्यारंभ तुझ्या कृपेने

ठेवावा हात कृपेचा सदा मायेने

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!१

 

येता पहा समीप लग्नघटिका

लाजली मोहक …….. बालिका ( वधूचे माहेरचे आडनाव )

भासली ती, मोगऱ्याची कलिका

शोभली जशी हो, हरीची राधिका

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!२

 

जमले सारे मंगल सोहळ्याला

आप्तेष्ट झाले आतुर कौतुकाला

चराचर सृष्टीही तयार उत्सवाला

दृष्ट न लागो कुणाची वधू-वराला

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!३

 

घडावी दांपत्याच्या हस्ते जनसेवा

जपावा मिळूनी संस्कारांचा ठेवा

करू नये कुणीही सुखाचा हेवा

हीच आहे प्रार्थना साऱ्यांची देवा

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!४

 

राखावा आदर एकमेकांचा

परस्पर स्नेह वाढावा त्यांचा

मान ठेवावा कायम नात्यांचा

उन्नतीसाठी हातभार दोघांचा

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!५

 

नांदो विश्वास सदा जीवनात

वसावी हो माणुसकी हृदयात

खंड ना पडावा कधीही नात्यात

रहावे उभयतांनी अक्षय्य सुखात

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!६

 

पै-पाहुण्यांचे स्नेहाने स्वागत

सज्जनांची घडत रहावी संगत

सहवासाने येवो जीवनास रंगत

नसावी उणीव अन् कसली खंत

कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान..!७

 

वधू-वरांची कीर्ती दुमदुमावी अनंतात

आदर्श रुजावा हा समाजात

राहावे माय-पित्यांच्या ऋणात

करावा संसार दोघांनी आनंदात

कुर्यात सदा मंगलम्…शुभ लग्न सावधान..!८

_________________________

©️®️

✍️… वैशाली पडवळ ‘एंजल वैशू’

अहिल्यानगर, महाराष्ट्र

सहाय्यक जनसंपर्क अधिकारी

जागतिक साकव्य विकास मंच

प्रतिक्रिया व्यक्त करा