You are currently viewing “अश्शी आमची आई”

“अश्शी आमची आई”

मराठी बालभारती, विविध मासिक, शॉर्ट फिल्म आदींमध्ये साहित्य प्रकाशित झालेल्या नंदुरबार येथील प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सुनंदा भावसार यांची अप्रतिम काव्यरचना

स्वयंपाकाच्या ओट्यावर झुरळ मिश्या हालवते
आमची आई पटकन,बाबांना बोलवते !

कुठूनतरी पिटुकला उंदिर येतो पळून
लगेचच आईचे ,पाय जातात गळून…

भिंतीवर फिरते छान ,गोरीगोरी पाल
आई म्हणते “बाहेर काढ” माझे होतात हाल

रोज जातेच मुंग्याची रांग लांब लांब
पावडर टाकीत आई म्हणते “थांब ,थांब,थांब!

कधीतर अंगणात सुद्धा ओरडते आई…
विचारलं तर म्हणते,”गांडूळ ईss बाईsss”

नाकतोडा ,बेडूक पाहून धूम पळून जाते..
अशा माझ्या आईला झूssलाॅजी आवडते !

“मला तर कळत नाही बिच्चारे हे काय करतात…?
अन् एवढे मोठ्ठे बाबा,आईलाच का घाबरतात?”

सौ.सुनंदा सुहास भावसार
90963 49241

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =