अवार्ड ऑनलाइन एप्लीकेशन 20 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सहा पर्यंत करण्याचे आवाहन..
धाराशिव :
महाराष्ट्र लोकविकास या स्वयंसेवी संघटनेच्या वतीने गेली 20 वर्षापासून तहयात कार्यकर्त्यांना सन्मानीत करण्याचे कार्य संघटना करत आहे.
ह्या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा दहा डिसेंबर २०२६ रोजी पर्याय फाउंडेशन कळंब जिल्हा धाराशिव (महाराष्ट्र) येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामध्ये विशेष कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते, लेखक, साहित्यिक,संपादक, पत्रकार, दुष्काळावर मात करणारे युवा शेतकरी उद्योजक ज्यांनी दुष्काळावरती मात करण्याचे विशेष कार्य केले आहे. अशांचा ट्रॉफी,मानपत्र देऊन सत्कार आयोजित करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र लोकविकास मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी दिली.आपले ऑनलाइन निवेदन देण्यासाठी खालील नंबर वरती संपर्क करावा अशी विनंती करण्यात येत आहे.9172972482 भूमिपुत्र वाघ सचिव महाराष्ट्र लोकविकास मंच यांच्याशी संपर्क करावा.
आपली ऑनलाइन माहिती 20 ऑक्टोबर 2026 पर्यंत पाठवावी असे आवाहन संघटनेचे वतीने करण्यात आले आहे.
