You are currently viewing सिंधुदुर्गात MSME चा 21 ते 23 जानेवारीला उद्योग मेळावा

सिंधुदुर्गात MSME चा 21 ते 23 जानेवारीला उद्योग मेळावा

● केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून सिंधुदुर्गसाठी मोठी घोषणा
● एमएसएमईचा भव्य उद्योग मेळावा
● सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सचिवांसह केंद्रीय अधिकारी राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश आत्मनिर्भरतेकडे दमदार पाऊल टाकत असताना देशाच्या उद्यमशील अर्थव्यवस्थेला दमदार बनवण्याचे काम आज गावखेड्याच्या अर्थव्यवस्थेने पूरक बनवले आहे. पारंपारिक अर्थव्यवस्था आणि उद्योजकता यांचा योग्य संगम करत देशाचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून आज देशाला एक बळकटी मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर देशाच्या एमएसएमएसई खात्याचा कारभार खऱ्या अर्थाने आज घौडदौड करत आहे.

कोरोना काळात संपूर्ण उद्योगव्यवस्था ठप्प असताना ग्रामीण अर्थव्यवस्थेने शहरी बाजारपेठेला दिलेली साथ कमालीची लक्षणीय होती. एमएसएमएसईच्या माध्यमातून या संपूर्ण कुशल उद्योग जगताला भारतभर पोहोचवण्याचे काम आज मोठ्या पातळीवर होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक गावखेड्यापर्यंत केंद्र सरकारच्या योजना आज त्वरित आणि सुलभरित्या पोहोचून आज सामान्य माणसाला त्याचा प्रचंड फायदा होत आहे.

देशाच्या अर्थखात्यातील भरीव तरतूद आज फक्त खात्यात न राहता नव्या उद्योजक कारागिरांना आणि स्टार्ट अप सुरु करणाऱ्या उद्योजकांना आज प्रेरणादायी बनत आहे.

एमएसएमईच्या माध्यमातून दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या प्रदर्शनात अवघ्या देशातील नवउद्योजक एकवटले होते. कोरोना काळातही अखंड अविरत सुरु असलेल्या या उद्यमशीलतेचे मोठमोठ्या उद्योजकांनी कौतुक केले. आणि अवघ्या देशभरात हे प्रेरणादायी उपक्रम सुरु होण्याची गरज व्यक्त केली.

एमएसएमईचा आवाका विस्तार आता प्रचंड वाढत चाललाय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुढाकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत प्रेरित अर्थसंकल्पीय वित्त नियोजन यामुळे देशात आज ग्रामीण उद्योजकांना खऱ्या अर्थाने प्रगतीपथाचे वातावरण आहे.

जे देशात ते माझ्या कोकणात हे विकासाचे सूत्र असणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता एमएसएमएसईच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांसाठी काही विशेष नियोजन केले आहे. केरळच्या धर्तीवर पर्यावरणपूरक उद्योगाची रचना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशी करता येईल या संदर्भात नियोजन सुरु आहे.

एमएसएमईच्या योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवउद्योजकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने 2022 च्या जानेवारी महिन्यात 21,22, 23 तारखेला उद्योग मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयांच्या सचिवांसह सर्व प्रमुख केंद्रीय अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा उद्योग मेळावा आत्मनिर्भर भारत संकल्पनेसाठी आज संप कोकणवासियासाठी एक दमदार सुरुवात मानली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 10 =