You are currently viewing गारपीट

गारपीट

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

गारपीट

 

रानातलं पीक बघून

शेतकरी सुखावला.

स्वप्नात हरवला.

 

शेतमाल विकून

घर नवं बांधू.

पोराला शहरात

शिकायला धाडू.

 

 

बायकोला पाटल्या

डोरलं करु.

पोरीला इंग्रजी शाळेत टाकू.

 

 

असं काही काही

मनात त्याच्या येई.

आणि सुंदर स्वप्नात

तो हरवून जाई.

 

पण घडलं विपरित.

अवकाळी पाऊस आला.

गावशिवाराला झोडपून गेला.

 

सैतानी धारा.

गारांचा मारा.

 

 

शिवारातलं सगळं पिकं

भुईसपाट झालं.

त्याचंही पीक

मातीत गेलं.

 

 

आत्महत्येचा विचार

मनात आला.

पण तो झटकून

तो पुन्हा शेतात गेला.

कामाला भिडला.

 

कवयित्री

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा