तळेरे ग्रामपंचायत येथे आधार सेंटर चा शुभारंभ

तळेरे ग्रामपंचायत येथे आधार सेंटर चा शुभारंभ

कासार्डे :

तळेरे ग्रामपंचायत येथे आज आधार केंद्र सुरू करण्यात आले. तळेरे सरपंच सौ साक्षी सुर्वे यांच्या हस्ते आधार केंद्राच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसरपंच दिनेश मुद्रस, सदस्य स्वप्नील वनकर, ग्रामसेवक युवराज बोराडे, राजेश जाधव, रवींद्र भोगले, आधार केंद्रचालक सुहास बीडये तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आधार कार्ड नूतनीकरण करणे तसेच बदल करणे यासाठी ग्रामस्थांना कणकवली सेंटरला जावे लागत होते. आता तळेरे ग्रामपंचायत मध्ये सेंटर झाल्याने ग्रामस्थांच्या सोयीचे झाले आहे. सरपंच साक्षी सुर्वे यांनी सुहास बीडये यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा