You are currently viewing सागरी  किनाऱ्यांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सतर्क

सागरी  किनाऱ्यांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सतर्क

-पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभलेल्या समुद्र किनाऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये व त्यावर वेळीच प्रतिबंध व्हावा, या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दल सतर्क व कटिबध्द असल्याचे प्रतिपादन, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.

                सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारा सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातुन भारतीय नौदलातर्फे दि. 15 नोव्हेंबर 2022 ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत 36 तासाकरिता See Vigil 2022 अभियान आयोजित करण्यात आले होते.

                पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यावेळी म्हणाले, सागर किनारा हा अत्यंत मोठा व लांब असल्याने किनारपट्टीवरील ठिकाणे अतिरिकी कारवाया करण्यासाठी तसेच अतिरेकी प्रवेश करण्याकरिता इतर कोणत्याही मार्गापेक्षा सागरी मार्ग हा सोईस्कर असल्याने आतापर्यंत देशाच्या  सरहद्दीमध्ये प्रवेश करण्यसाठी सागरी मार्गाचा वापर केला आहे. अतिरेक्यांकडून सागरी मार्गाने प्रवेश करुन मच्छिमार बोटी, ट्रॉलर्स इत्यादी मासेमारी करणाऱ्या बोटी व जहाजे यांचा वापर करुन समुद्रामार्ग किनाऱ्यावर येऊन देशाची संपत्ती व  नागरीकांना हानी करण्याची शक्यता असल्याने सागरी सुरक्षेवर अत्यंत लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

                सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून या अभियान एकुण 40 पोलीस अधिकारी, 256 पोलीस अंमलदार, 40 गृहरक्षक दलाचे जवान,126 सागर रक्षक दल सदस्य, 36 वार्डन तर NCC चे 58 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, यांचे मार्गदशखाली करण्यात आली . तसेच सागरी सुरक्षा विभागाचे पोलीस निरीचक अनिल जाधव,यांनी समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा