You are currently viewing भटवाडीतील महिलेचा बस मधून लॅपटॉप लंपास…

भटवाडीतील महिलेचा बस मधून लॅपटॉप लंपास…

भटवाडीतील महिलेचा बस मधून लॅपटॉप लंपास…

सावंतवाडी

पुणे निगडी ते सावंतवाडी असा खाजगी बस मधून प्रवास करणार्‍या भटवाडी येथील तेजल अवधूत सप्ते यांच्या बॅगमधून ६० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. ही घटना ३ मे ला घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, सौ. सप्ते या ३ मे ला सायंकाळी पुणे निगडी वरून सावंतवाडीला येणाऱ्या खाजगी बसमधून प्रवास करत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी ४ मे ला घरी आल्यानंतर बघितले असता बॅगमध्ये लॅपटॉप मिळाला नाही. शोधाशोध करून देखील लॅपटॉप मिळाला नसल्याने अज्ञात चोरट्याबाबत त्यांनी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा