You are currently viewing सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश

सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश

प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे च्या मार्फत वि.वि.सडूरे अरुळे मध्ये लसीकरण केंद्रचे तहसीलदार रामदास झळके यांच्या शुभहस्ते झालं उद्घाटन

नवलराज काळे यांना दिलेल्या लेखी आश्वासनाची आरोग्य यंत्रणेकडून अंमलबजावणी

लसीकरण मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत अरूळे सहित पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतींचे मोलाचे सहकार्य

वैभववाडी

प्राथमिक आरोग्य केंद्र सडुरे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र चालू करणे बाबत पंचक्रोशीतून पहिली मागणी वैभववाडी तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री नवलराज काळे यांनी 15 मार्च 2021 रोजी आरोग्य यंत्रणेकडे निवेदनाद्वारे केली होती. सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे जनतेला तालुकास्तरावर ती लसीकरण करण्यास ये जा करता येत नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे येथे कोरोना प्रतीबंधक लसीकरण केंद्र चालू झाल्यास सडूरे शिराळे सहीत कुर्ली, अरूळे, निम अरूळे, सांगुळवाडी नावळे या गावातील जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो व या केंद्रामुळे पंचक्रोशीतील जनतेला दिलासा मिळू शकतो तरी या सर्वांचा विचार करून लसीकरण केंद्र चालू करण्याबाबत आरोग्य यंत्रणेने सहकार्य करावे असे निवेदनात म्हटले होते.

या पार्श्वभूमीवर ती वारंवार आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात राहून नवलराज काळे लसीकरण केंद्र संदर्भात पाठपुरावा करीत होते. काळे यांच्या मागणीनंतर ग्रामपंचायत सडुरे- शिराळे व अरुळे ग्रामपंचायतीने देखील ही मागणी उचलून धरली व ग्रामपंचायत अरूळे सरपंच उज्वल नारकर यांनी सहकार्याची भूमिका दर्शवली. तसेच 3 मे 2021 रोजी काळे यांनी लसीकरण केंद्र व कायमस्वरूपी रुग्णवाहिका मिळणेबाबत या दोन मागणीसाठी पुन्हा एकदा तहसीलदार यांच्या सहीत संबंधित प्रशासनाचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. तरीही लसीकरण केंद्र मंजुरीसाठी, व कायमस्वरूपी रुग्णवाहिका देणेबाबत आरोग्य यंत्रनेकडुन कोणताच ठोस निर्णय होत नव्हता. त्यामुळे नवलराज काळे यांनी या दोन मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत 13 तारखेला व्हाट्सअप मेल द्वारे व 14 तारखेला तहसीलदार कार्यालयाला प्रत्यक्ष भेटून कायमस्वरूपी रुग्णवाहिका व COVID-19 लसीकरण चालू करण्याबाबत मागील केलेल्या मागण्यांचा संदर्भ देत निवेदन दिले होते. तसेच यावेळी आठ दिवसांमध्ये या मागण्या मान्य न झाल्यास 21 मे 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला .

या निवेदनाचा संदर्भ देत तालुक्याचे तहसीलदार रामदास झळके यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना, जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे सदर मागणीची पूर्तता करण्यासाठी 18 मे 2021 रोजी पत्र व्यवहार केला . 20 मे 2021 रोजी तालुका आरोग्य विभागाच्या अधिकारी यांच्या सोबत श्री काळे यांची तहसीलदार यांच्या समावेत एक बैठक पार पडली. जिल्हा वरून रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास प्राधान्य क्रमाने प्रा. आ केंद्र सडूरे ला उपलब्ध करून देऊ असे उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकारी यांनी सांगितले.तूर्तास 102, 108 सेवा चालू आहे अडचण असल्यास प्रशासनाशी संपर्क साधा, नवीन रुग्णवाहिका येऊ पर्यंत पंचक्रोशीत 102,108 वर सेवा पुरवू.पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली आहे.रुग्ण वाहिका आपल्यास नक्की मिळेल . तसेच Covid 19 लसीकरण बाबत बोलत असताना आरोग्य विभागचे अधिकारी बोलले सद्या प्रा.आ. केंद्र सडूरे जागेची अडचण असलेमुळे प्रा. आ केंद्र सडूरे मार्फत विकास विद्यालय सडूरे अरुळे या शाळेमध्ये तालुक्यात लसीचा पहिला डोस उपलब्ध झाल्यावर प्राधान्याने लसीकरण केंद्र चालू करूया अशी चर्चा करण्यात आली. आम्ही सर्व परीने आपल्या मागण्या पूर्ण करू असे तालुका आरोग्य प्रशासनाच्या अधिकारी यांनी असे सांगत काळे यांना उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली.यावेळी काळे यांनी माझ्या मागण्या जनतेच्या सेवेसाठी आहेत.त्यावर आपण प्रशासन सकारात्मक भूमिका दाखवत असाल तर माझे आपल्याला पूर्णपणे सहकार्य असेल. सदर मागणी पूर्ण होणे बाबत आरोग्य विभागाने लेखी स्वरूपात मला व जनतेला आश्वसीत करावे त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा विचार करू असे काळे यांनी सांगितले. यावेळी तालुका तहसीलदार रामदास झळके , आरोग्य विभागाचे अधिकारी श्री चव्हाण उपस्थित होते. या चर्चेमध्ये तहसीलदार रामदास झळके साहेब यांची शिष्टाई ला यश आले.

अन् अखेर 20-05-2021 रोजी रात्री उशिरा तालुका आरोग्य विभागाकडून काळे यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.
आरोग्य विभागानी दिलेल्या लेखी स्वरूपाचे आश्वासन पूर्ण होईल त्या दिशेने त्यांची वाटचाल असावी, मी
पंचक्रोशीतील जनतेसाठी केलेल्या मागण्या पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. वैभववाडी तालुका आरोग्य विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तसेच वैभववाडी तालुक्याचे तहसीलदार या नात्याने तुम्ही स्वतः ,पोलीस निरीक्षक अतुल जाधव सर व त्यांचे सहकारी श्री भोवड आपण सर्वांनी केलेल्या शिष्टाईचा मान राखून आज 21 मे 2021 रोजी मी करत असलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण तूर्तास स्थगित करीत आहे. लेखी स्वरूपात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आपल्या माध्यमातून सहकार्य मिळावे. माझ्याकडून प्रशासनाला शंभर टक्के लागेल ते सहकार्य मिळेल अशी आपणास आश्वासन वैभववाडी तालुका तहसीलदार यांना दिले,मात्र तालुका आरोग्य प्रशासनाकडून लेखी स्वरुपात देलेल्या आश्वासनाची अमंलबजावनी न झाल्यास जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या विरोधात अमरण उपोषण करण्याचा इशारा ही 21 मे 2021 रोजी काळे यांनी दिला होता.

काळे यांच्या दोन मागण्या पैकी कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र चालू करण्याबाबत च्या मागणीची अंमलबजावणी दि.24 मे 2021 रोजी आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आली. हे लसीकरण मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत अरूळे सहित सर्व ग्रामपंचायतींचे मोलाचे सहकार्य लाभले.या लसीकरण केंद्रामुळे पंचक्रोशीतील सर्व जनतेला लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या केंद्रावर 45 वर्षावरील व्यक्तींना 100 डोस पहिल्या फेरीत उपलब्ध झाले आहेत
प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे मार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचा उद्घाटन सोहळा वैभववाडी तालुका तहसीलदार रामदास झळके, पंचायत समिती वैभववाडी गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांच्या शुभहस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र सडूरे चे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका बंडगर, प्राथमिक आरोग्य केंद्र वैभववाडी सडूरे सुपरवायझर आनंदा चव्हाण, अरुळे गावचे सरपंच उज्वल नारकर,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस तथा ग्रामपंचायत सदस्य सडूरे शिराळे नवलराज काळे,निम अरुळे गावच्या सरपंच सौ सविता कदम, अरूळे ग्रामपंचायतचे माजी सदस्य श्री सूर्यकांत बोडके, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रावराणे, ज्येष्ठ समाजसेवक शशिकांत रावराणे, सिताराम बोडके, नावळे ग्रामपंचायत ग्रामसेवक श्री गुगे, सडूरे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका शीतल चाफे, सांगुळवाडी नावळे उपकेंद्राच्या आरोग्य सेविका सायली जाधव , प्राथमिक शिक्षक(मुख्याध्यापक शिराळे) विनोद कर्पे,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अरुळे बूथ अध्यक्ष आदेश रावराणे, व इतर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचारी, उपस्थित होते, तसेच या ठिकाणी लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी सडूरे, अरुळे, निमअरुळे, सांगुळवाडीचे ग्रामस्थ कोरोना संदर्भातील सर्व नियमाचे पालन करून उपस्थित होते. यावेळी तहसीलदार रामदास झळके साहेब व आरोग्य यंत्रणेचे नवलराज काळे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 − 2 =