You are currently viewing मंत्री अनिल परब यांना वाचवूनच दाखवा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

मंत्री अनिल परब यांना वाचवूनच दाखवा, किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज

माजी मंत्री अनिल देशमुख यांना फरार घोषित करा

कणकवली

मुख्यमंत्री सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी १९ बंगले बांधले आहेत असा गौप्यस्फोट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्रात मनमानी करणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत असतील तर जसे मिलिंद नार्वेकर यांचा बंगला पाडला तसा अनिल परब यांचेही रिसॉर्ट पाडावे लागणारच. माझे चॅलेंज आहे उद्धव ठाकरेंना त्यांनी अनिल परब याना वाचवून दाखवावे. यापुढे ठाकरेंची दादागिरी चालणार नाही अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठणकावले.
कणकवलीत प्रहार भवनात माजी खासदार सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत उपस्थित होते. मंत्री अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट पाडणारच असे खुले आव्हान भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले आहे.

मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर दोन अनाधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. एका रिसॉर्टवर कारवाईचे आदेश झाले आहेत. तर दुसरा रिसॉर्ट आहे. दापोली मुरुड येथे सीआर झेड भंग केला आहे. त्याला वाचवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी केले आहे. राज्य सरकारने कोस्टल झोन मॅनेजमेंटला पत्र दिले, घोषित केले अनधिकृत रिसॉर्ट आहे असे, तसा निर्णय झाला. रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना तोडण्याचे आदेश देण्यात आले,त्याचे मालक अनिल परब अजून मंत्री आहेत. हे दुर्दैवी असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

मंत्रिमंडळात असलेले मंत्री परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. अनिल परब यांची हकालपट्टी होणारच, त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणारच आहे.अनिल परब यांनी बेनामी प्रॉपर्टी तयार केली आहे. त्याची चौकशी करावी, असे राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी आदेश दिले आहेत. लोकायुक्त यांनी चार्ज घेतला आहे, या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे. राज्य सरकारने ५ पाणी अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप कारवाई नाही, आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा श्री. सोमय्या यांनी दिला आहे.

ठाकरे सरकारची डर्टी १२ मंत्री नेत्यांची नावे जाहीर केली. त्यात जितेंद्र आव्हाड बारावे आहेत. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा ६ सप्टेंबरला राईट हँड असलेल्या सईद खानला हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. इडीला १२ जणांचे पुरावे मी दिले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहेत.

माजी गृमंत्री अनिल देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. साक्षीदारांना, अधिकाऱ्यांना वकील लाच देताना अटक केली. माजी गृमंत्री अनिल देशमुख, त्याच्या मुलांवर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
नो डेव्हलपमेंट झोन मध्ये अजून दोन बंगले आहेत, मिलींद नार्वेकर यांचा एक रिसॉर्ट उघड झाला होता.आज पुन्हा दुसरा उघड झाला आहे. अनिल परब १७ हजार ५०० स्क्वेअर फूट रिसॉर्ट आहे, त्यांनी ४५ हजार प्रॉपर्टी टॅक्स भरला. ठाकरे यांना खुले चॅलेंज करतो, शिवसेनेची दादागिरी खपवून घेणार नाही.अनिल परब रिसॉर्ट पडणारच आहे. माझी लढाई अनिल परब विरोधात नाही तर ठाकरे सरकार विरोधात आहे, ही दादागिरी खपवून घेणार नाही, असेही सोमय्या यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + six =