You are currently viewing सिंधुदुर्गात उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज…

सिंधुदुर्गात उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज…

सिंधुदुर्गात उद्या होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज…

नियमांचे पालन करत मतदारांनी मतदान करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…

सिंधुदुर्ग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून उद्या ९१८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सर्व सिंधुदुर्गातील मतदारांना आवर्जून मतदानात भाग घेत जिल्ह्यातील मतदानाचा उच्चांक गाठण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

याबाबत त्यांनी आपली मुलाखत दिली आहे. ते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ४४० अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहेत. त्यासोबतच वाढत्या उष्णतेमुळे मतदान केंद्रावरील कर्मचारी व मतदारांच्या सुरक्षिततेसाठी फर्स्टटेड किट व पाण्याची मुबलक सोय करण्यात आली आहे. त्यासोबतच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २ हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे नियमांचे पालन करत मतदारांनी मतदान करावे असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा