You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक नागेंद्र टक्केकर यांचे अल्पशा आजाराने निधन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक नागेंद्र टक्केकर यांचे अल्पशा आजाराने निधन

सावंतवाडी

सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक श्री नागेंद्र टक्केकर (वय ६०) यांचे आज दिनांक २१ जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४.३० वा. सावंतवाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविद्यालयात जवळपास ३० वर्षे त्यांनी फिजिक्स या विषयाचे अध्ययन केले. दोन वर्षांपूर्वीच प्रा.टक्केकर सेवानिवृत्त झाले होते. आपल्या शांत स्वभावामुळे ते विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते सदस्य होते.
गेले दोन दिवस प्रकृती खालावल्यामुळे सावंतवाडी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  रात्री नऊ वाजता सावंतवाडी येथील उपरल स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रशिया व युक्रेन युद्धाच्या दरम्यान त्यांचा मुलगा युक्रेन मध्ये अडकला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 11 =