You are currently viewing आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून २० लाख कोटींचे पॅकेज लोकांपर्यत पोहचवणार..

आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून २० लाख कोटींचे पॅकेज लोकांपर्यत पोहचवणार..

– जिल्हाध्यक्ष राजन तेली

कणकवली

उमेद अभियान दुर्दैवाने खासगी लोकांच्या घशात घालण्याचा घाट केला जात असून,५ हजार महिलांनी एकत्र येत काढलेल्या मोर्चा वेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या महिलांसमोर खोट्या वल्गना करून महिलांना फसवत असल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. हे सरकार फेल गेले असून, पगार नसल्याने एस.टी. कर्मचारी आत्महत्या करत आहेत.

तसेच भात पीक नुकसानीबाबत देखील हे सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप त्यानी केला आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ बंद करून ठाकरे सरकारने तळागाळाती लोकांवर अन्याय केला आहे. त्याचा आपण निषेध करत असल्याचे पण त्यांनी स्पष्ट केले आहे. मत्स्य पँकेज मध्ये देखील अनेक जाचक अटी शर्ती घातल्या आहेत. परंतु पालकमंत्री आमदारांचे आणि आमदार पालकमंत्र्यांचे कौतुक करण्यातच धन्यता मानत आहेत. वाळू लिलाव झाला नसताना देखील मोठ्या प्रमाणत वाळू कोल्हापूर व गोवा येथे जात असून, यामागे कोण आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात अवैद्य धंदे, चोरी प्रकरणात मोठ्या प्रमाणत युवक वाहत जात असून, शासन आणि प्रशासन यात ताळमेळ नसल्याने या धंद्यांना उत आला आहे. याविरोधात भाजप दिवाळीनंतर रस्त्यांवर उतरून जाब विचारणार असल्याचा इशारा राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून २० लाख कोटींचे पॅकेज लोकांपर्यत पोहचवले जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. जिल्ह्यात रोजगार निर्मितीची व्युहरचना भाजप करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 1 =