You are currently viewing लेखिका कवयित्री वसुधा नाईक यांची मानवसेवा प्रतिष्ठानच्या निवासी गुरुकुलला भेट

लेखिका कवयित्री वसुधा नाईक यांची मानवसेवा प्रतिष्ठानच्या निवासी गुरुकुलला भेट

*मुलांना शैक्षणिक साहित्य व भोजनाची दिली मेजवानी*

 

पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द गाव. येथील “मानवसेवा प्रतिष्ठान” या निवासी गुरुकुलुला भेट देण्याचा योग आला. याचे संस्थापक मा.सुनील मतकर सर आहेत. राळेगण सिद्धी येथे आपल्या संस्थेचा कार्यक्रम झाला. त्यात मा.देवा सरांनी अनेकांना ट्राॅफी देवून गौरव केला.व पुढील कार्यास प्रेरणा दिली. याचा आदर करून मी सौ. वसुधा वै. नाईक दर महिना एक उपक्रम राबवायचाच हे मनाशी ठरवले. यात माझी मुले व माझे पती यांचे मोलाचे सहकार्य मिळत असते.तसेच माझे स्नेही श्री.शशिकांत सुतार यांचे सहकार्यही लाभते.

काल सुनिल सरांच्या संस्थेला भेट दिली. आपला स्वतःचा बॅनर लावताना खूप आनंद झाला होता.

सुनिल सरांनी स्थापन केलेल्या या संस्थेत एकूण २५ अनाथ बालके शिक्षण घेत आहेत. खूप छान आणि शिस्तप्रीय सुनिल सरांनी मुलांनाही शिस्त लावून त्यांच्याकडून छान अभ्यास करून घेत आहेत. तेथे दोन शिक्षक देखील निवासी आहेत.

या ठिकाणी मुलांना अत्याधुनीक तंत्रज्ञान देखील शिकवले जाते. संगणक आहेत. ईतर सर्व शालेय सुविधा आहेत.या चिमुकल्यांना भेटून खूप आनंद झाला.

आषाढी एकादशी हा कालचा दिवस मनावर कोरला गेला. मुलांची वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षलागवड करण्यात आली. माझ्या हातून वृक्षारोपण करण्यात आले. या संस्थेकडून आमचा सत्कार केला गेला. हे सर्व स्विकारताना मन भरून आले होते.

या छोट्यांना एक दिवसाची पंगत याचा खर्च आम्ही दिला.व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटले.

“आनंदाचे गाणे”मुलांकडून म्हणून घेतले.तर सुनिल सरांनी “किती सांगू मी सांगू कुणाला” हे गीत सादर केले.

असा हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम सोहळा जरा आगळावेगळा आणि मनात खोलवर रूजणारा झाला. मा.सुनिल सरांचे आभार मानते.

तसेच *रा.ब.संस्था ,भारत* या संस्थेच्या अधिपत्याखाली श्री.देवा तांबे सरांनी जो विश्वास दाखवला त्या बद्दल त्यांचेही आभार मानते. काल दोन कार्यक्रम झाले.

१)वृक्षारोपण

२)अनाथ मुलांशी सुसंवाद,शै.साहित्य भेट

 

*सो.वसुधा नाईक,पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा