You are currently viewing माजी सैनिकांना निवासी इमारत मालमत्ता करातून सूट…

माजी सैनिकांना निवासी इमारत मालमत्ता करातून सूट…

सिंधुदुर्गनगरी

सैनिक कल्यण विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एका निवासी इमारत मालमत्तेला करातूट सूट देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली.

            मालमत्ता करातून सूट मिळण्याबाबतचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी माजी सैनिकांचे ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, मागील मालमत्ता कर भरल्याबाबतच्या पावत्या तसेच मालमत्ता कर माजी सैनिकांच्या पत्नीच्या नावे असल्यास पी.पी.ओ. किंवा पार्ट-2 ऑर्डरची प्रत, डिश्चार्ज पुस्तकात पत्नीच्या नावाचा उल्लेख असलेल्या पानाची प्रत आदी कागदपत्र जोडून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − five =