You are currently viewing पाडलोस माडाचे गाळू येथे शॉर्टसर्किटमुळे आग

पाडलोस माडाचे गाळू येथे शॉर्टसर्किटमुळे आग

पाडलोस माडाचे गाळू येथे शॉर्टसर्किटमुळे आग

ग्रामस्थांच्या जागरूकीमुळे अनर्थ टळला…

बांदा

पाडलोस माडाचे गाळू येथे दोन ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. यात किरकोळ नुकसान झाले असून सुदैवाने बैलजोडी वाचवण्यास यश आले आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यास यश मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. दरम्यान दरवर्षी आणि सलग चौथ्या वर्षी आग लागत असलेल्या ग्रामस्थांत नाराजीचे वातावरण आहे. ही घटना काल दुपारी घडली. यात तुकाराम गावडे यांचे दोन टेम्पो लाकूड जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माडाचेगाळू येथे सलग चौथ्यावर्षी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. विद्युत वाहिन्या एकमेकांना घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले व त्याची ठिणगी सुक्या गवतावर पडली. दुपारची वेळ असल्याने वाऱ्याच्या झोकात आग घराजवळ पोहोचली. घरातील मंडळी झोपी गेली होती. परंतु आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली व घरापासून अवघ्या चार फुटावर आग रोखण्यात आली. यावेळी परिसरात असलेला डंपर तात्काळ बाजूला करण्यात आला. आगीत तुकाराम गावडे यांचे दोन टेम्पो जळाऊ लाकूड मात्र जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आग विझविण्यासाठी चंद्रकांत नाईक, सखाराम गावडे, मुकुंद गावडे, चंद्रकांत शेटकर, गुणाजी गावडे, जानकी गावडे, अनुजा गावडे, दुर्गावती गावडे, शेवंता राऊळ यांनी शर्तीचे प्रयत्न केले.

केणीवाडा येथे दुपारच्या सुमारास अचानक बागायतीत धूर येत असल्याचे गौरेश पटेकर यांना दिसले. त्याच बागायतीमधील झाडाखाली बैल जोडी बांधून ठेवण्यात आली होती. गौरेश यांनी जीवाची परवा न करता आगीतूनच धाव घेत आपल्या बैल जोडीला वाचविले. तसेच परिसरात आग लागल्याचे सांगताच ग्रामस्थांनीही धाव घेतली. विहिरीच्या पाण्याने कळशीतून पाणी ओतून आग विझविण्यात यश आले. सदर आगीचे कारण समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी गौरेश पटेकर, अमोल नाईक, सप्रेम परब, अंकुश पटेकर, हर्षद परब, आनंद पटेकर, बाबी कोरगावकर, रोहन परब, प्रचला पटेकर, दिव्यांनी पटेकर, दिनेश पटेकर आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा