सिंधुदुर्गातील जुगाऱ्यांची बैठक बसली रत्नागिरीच्या हद्दीत…

सिंधुदुर्गातील जुगाऱ्यांची बैठक बसली रत्नागिरीच्या हद्दीत…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जुगाराचे अड्डे बसवून सुद्धा त्यांच्या जागा मीडियाला माहिती होत असल्याने संबंधित खात्याचे अधिकारी जिल्ह्यात मीडियामध्ये जाहीर झालेल्या सुरक्षित जागी जुगाराची बैठक बसविण्यासाठी परवानगी देत नसल्याने फोंडयातील पारावरचा विठ्ठल नामाचा जप करणाऱ्यांसहित जिल्ह्यातील जुगाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर खारेपाटण-राजापूर हद्दीपासून पाच मिनिटांच्या अंतरावर उजव्या बाजूला बंद असलेल्या हॉटेलात नवीन बैठकीला सुरुवात केली आहे.
फोंडयाच्या पारावरच्या विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या सहीत सिंधुदुर्गातील जुगारी विठ्ठल नामाचा जप करत पोचले राजापुरात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल २४ जणांची तकशीम असलेला अंदर-बाहर जुगार कालपासून सुरू आहे. सिंधुदुर्गातील २४ जण पार्टनर असलेल्या विठ्ठलाच्या जुगाराच्या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वरदहस्त लाभलेला आहे. सिंधुदुर्गातील या जुगाऱ्यांना रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांच्या देखील आशिर्वाद असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर बैठक बसवताना संपूर्ण काळजी घेऊनच सिंधुदुर्गातील जुगाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. संबंधित खात्याचीही हफत्याची सोय नक्कीच केलेली असणार त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुगाराची बैठक न घेता जिल्ह्याच्या बाहेर पत्त्यांचा विठ्ठल जप सुरू झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा