विद्यापीठ परीक्षा ऑनलाईन

विद्यापीठ परीक्षा ऑनलाईन

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन पुकारण्यात आल्याने विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी जाहीर केले. कुलगुरूंसोबत परीक्षांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचे निश्चित झाले. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन सुरू होत्या. मात्र कडक निर्बंधांमुळे आता ऊर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील, असा निर्णय झाल्याचे सामंत यांनी सांगितले.

तेराही अकृषी विद्यांपीठात शुक्रवारपासून ऑफलाईन परीक्षा होणार नाहीत. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. टीवायचीही परीक्षाही ऑनलाईन असेल, असे उदय सामंत म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा