You are currently viewing कानबाई
Oplus_16908288

कानबाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कानबाई* 🌹

 

सासुरवाशीण कानबाई

आज आली माहेराला

लक्ष्मीच्या पावलांनी

घरदार सजायला

 

वेशीवर कानबाई

मारुती दर्शन घेईल

दोन दिवस राहील

सुख समृध्दी देईल

 

कानवाई पुढे गेली

सुताराच्या अंगणात

तिच्या स्वागताला दिसे

चौरंग नि पिढेपाट

 

कांनबाईची पाऊल

गेली सोनाराच्या घरी

घडविले तीजसाठी

ठुशी, बांगडया गळसरी

 

कानबाईची पाऊल

गेली कुंभाराच्या घरी

हंडीवरी चढे हंडी

सप्तधान्यांच्या घागरी

 

कानबाईची पाऊल

गेली शिंपीदाच्या घरी

खणानारळाची ओटी

नैवेद्य भरली सांजोरी

 

कानबाईची पाऊल

आली माळ्याच्या अंगणी

झेंडु, जाई,,मोगऱ्याची

फुले पडली चरणी

 

कानबाईची पाऊल

गेली पाटलाच्या घरी

लक्ष दिप ओवाळीत

आनंदे आरती करी

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा