You are currently viewing मत्स्यप्रेमभंग

मत्स्यप्रेमभंग

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध मालवणी कवी लेखक “भोवतालकार” श्री.विनय सौदागर, (आजगावं) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मत्स्यप्रेमभंग*
v/v/s………

(आमच्या किनार्‍यावरच्या माणसाचो प्रेमभंग झालो, त्या टायमाक गाळी मारण्यापेक्षा ‘माश्याचो शिवाडो’ करणा ह्येका योग्य वाटला.. त्येचीच मगे कविता झाली. )

मी इसवणाचो तुकडो
तू नासको सवंदाळो
मी गाबतीणीचो कोयतो
तू बिनधारेचो आदाळो

मी इरडाचो मोटलो
तू बासो बुरयाटो
मी कापातलो कपो
तू कर्लेचो काटो

मी थडथडीत बांगडो
तू इणाग, पात्साळा
मी रसगुळयेची आमटी
तू ढमाक ढवळा

मी खाडयेतली सुंगटा
तू गोलमो सुको
मी काळ्या पाखाची मोरी
तू गडदम लुको

मी सरंग्याची कळपुटी
तू पचकर्म्याचो वाटो
मी अख्या पापलेट
तू धोडकारो खोटो

मी सुळ्याची गाथन
तू मोतयाळ्याची पिशी
मी शेतक्याचा सुक्या
जा घाटार, रव उपाशी.

(भोवताल-3..काव्यसंग्रह)

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
९४०३०८८८०२ ………२८

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 5 =