You are currently viewing दैवयोग

दैवयोग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम गझल*

*वृत्त राधा*
(गालगागा गालगागा गालगागागा)

*दैवयोग*

गोडवे शब्दात त्यांचे आटले होते
सूरही कंठात आता दाटले होते

आर्जवे केली किती मी वेळच्यावेळी
मी पणाने घर मनाशी थाटले होते

ठेवली नावे किती पाठून त्यांचेही
मान खाली घालुनी पद चाटले होते

सभ्यतेचा आव खोटा आणतो नेता
पुण्य त्यांचे पाप मार्गी बाटले होते

कायद्याने हक्क त्यांचा भेटतो आहे
श्रेय त्याचे भामट्यांनी लाटले होते

द्वेष मत्सर बीज हृदयी रोवले त्यांचे
दृढ नाते दैवयोगे फाटले होते

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

 

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल*
*🔹 तीळ तेल🔹 करडई तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

 

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

प्रतिक्रिया व्यक्त करा