You are currently viewing प्रिय मित्र नितीन आठवण सदैव

प्रिय मित्र नितीन आठवण सदैव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांची मित्र कै.नितीन कुडाळकर याच्या स्मृती प्रित्यर्थ लिहिलेली काव्यरचना*

*प्रिय मित्र नितीन*
*आठवण सदैव*

तुझ्या सुखद आठवणी
अजुनी रेंगाळतात मनी
नेत्र ओले मग नकळत
गळतात गाली त्याक्षणी

तू असतोस पापण्यांवर
मिटताच लुप्त होतोस
दिवस सुखाचे आठवुनी
तरी तू कुठे रे दिसतोस

तू झालास एक कल्पना
ती सुखात सोबत केलेली
दुःखात कुणास पाहिलंस
की पाहीली दुःखे विरलेली

नाव तुझं आजही येतंय
कितीक जणांच्या मुखात
गुण स्वभाव स्मरतात कुणी
भले विसरतील तुज सुखात

कणाकणात मैत्रीच्या दोस्ता
वास तुझा दरवळत राहील
हास्य तुझ्या गालांवरचे बस
स्मृती सदैव जागवत ठेवील

(दीपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =