You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची स्थापना!

सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची स्थापना!

ओरोस

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यावसायिक शिक्षण विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांची बैठक रवळनाथ मंदिर ओरोस येथे पार पडली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम व तांत्रिक अभ्यासक्रमाकडे कार्यरत असणारे १४ शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी उपस्थित होते.
१९८९-९० मध्ये केंद्रशासन पुरस्कृत व्यवसाय अभ्यासक्रम शासनाने सुरू केले त्याचा हेतू उच्च शिक्षणाकडील लोंढा कमी करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे व रोजगार रोजगाराच्या संधी त्यांना प्राप्त व्हाव्यात हा होता. मात्र आज शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे व्यवसाय शिक्षण अनेक समस्यांच्या गर्तेत अडकलेले आहे. या सर्वांवर आवाज उठवण्याचे हेतूने जिल्ह्यातील व्यवसाय शिक्षण विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन “सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटना” स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.


यावेळी फोंडाघाट जुनिअर कॉलेजचे श्री डिसोजा सर यांनी प्रास्ताविक केले. या सभेस हरिभाऊ भिसे, प्रभू सर, कोकाटे सर, बांदेकर सर, पिंगुळकर सर, परब सर, श्री डोर्लेकर, गुरुनाथ कुडाळकर, श्री दळवी, श्री ठाकूर, कदम सर, रासम सर, डिसोजा सर, चरणदास फुकट, रमेश जाधव सर, लंगडे मॅडम, मिलिंद जाधव , भानुदास परब , जामदार सर, वेंगुर्लेकर मॅडम, श्री.अनंत स्वार, श्री.धुमक आदी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष पदी श्री. एम. एल. डिसोजा, उपाध्यक्ष श्री.बांदेकर सर, सचिव श्री.भानुदास परब, खजिनदार श्री.मिलिंद जाधव अशी कार्यकारणी ची निवड करण्यात आली. पूर्वीप्रमाणेच संस्थेची सेवा जेष्ठता यादी एकत्र तयार करणेस संस्थाना सांगणे व व्यवसाय शिक्षण कर्मचाऱ्यांना त्यामध्ये सामावून घेणे, ज्या संस्थांमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत तिथे शासनाने सी. एच.बी. बेसिसवर मान्यता देऊन त्यांना मानधन देणे व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करणे, निवड श्रेणीचा प्रश्न, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न, तसेच वेतन वेळेवर होत नसल्याबाबतचा प्रश्न, इत्यादीवर सखोल चर्चा करण्यात आली.


यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम कुडाळ हायस्कूल कुडाळ वर मुख्याध्यापक म्हणून व्यवसाय शिक्षण विभागाकडील श्री प्रभू वालावलकर सर यांनी काम करून ते सेवानिवृत्त झाले त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी फोंडाघाट या संस्थेने ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट मधील व्यवसाय शिक्षण विभागाकडील श्री रासम सर यांना सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पद देऊन एक प्रकारे सर्व संस्थेतील कर्मचाऱ्यांची एकच सेवाजेष्ठता यादी तयार करून व्यवसाय शिक्षण कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याचे श्री मिलिंद जाधव यांनी प्रतिपादन केले.यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री.रासम सर यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
बैठकीच्या शेवटी श्री.भिसे सर यांनी आभार व्यक्त केले व या शेवटच्या टप्प्यात सर्व कर्मचाऱ्यांनी एकोपा दाखवण्याची गरज असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =