You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रिडा व्यवसाय सुरू करण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रिडा व्यवसाय सुरू करण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी परवानगी द्यावी

बाबा मोंडकर जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ

राज्य सरकार ने कोविड नियमाचे पालन करून जलक्रिडा व्यवसायचालू करण्यासाठी स्थानिक जिल्हाधिकारी यांच्या परवांगीनुसार जलक्रिडा व्यवसाय चालू करण्याचे आदेश दिले आहेत त्यां प्रमाणे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी किल्ला वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे परंतु सागरी पर्यटनासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांनां सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मुख्यआकर्षण असणाऱ्या जेट्स्कि,बंपर राईड, बनाना राईड, स्पीडबोट राईड,वॉटर स्कूटर यां जलक्रिडा वॉटरस्पोट ला परवानगी न दिल्यामुळे जिल्ह्य़ात आलेल्या पर्यटकांना यां सेवे पासून वंचित राहावे लागत आहे गेले दीड वर्षापेक्षा जास्त काळ कोरोना व्हायरस मुळे जलक्रिडा पर्यटन व्यवसायीक आर्थिक संकटात आला असून दैनंदिन खर्च भागवणार कुठून हां यक्ष प्रश्न त्यांच्या समोर आहे.या संबंधी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन दिले असून वॉटरस्पोट जलक्रिडा प्रकल्प चालू करण्याची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली आहे. सदर जलक्रिडा व्यवसायास परवानगी दिल्यास जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय वाढीस मदत होईल व जलक्रिडा व्यावसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशी माहिती श्री बाबा मोंडकर जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा