You are currently viewing वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे कुडाळ मध्येही उमटले पडसाद

वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे कुडाळ मध्येही उमटले पडसाद

*आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे कुडाळमध्ये तीव्र आंदोलन*

 

*दिंडी काढत शिंदे- फडणवीस सरकारचा केला निषेध*

कुडाळ :

आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचे पडसाद आज कुडाळ मध्येही उमटले. आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या निषधार्थ दिंडी भजन आंदोलन केले. वारकऱ्यांचा वेश परिधान करून टाळ मृदंगाच्या तालावर विठू नामाचा जयघोष करीत कुडाळ शिवसेना शाखा ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.तहसील कार्यालयासमोर भजने म्हणत दिंडी काढण्यात आली. तसेच तहसीलदार अमोल पाठक यांना दोषींवर कारवाईसाठीचे निवेदन देण्यात आले.

वारंवार हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार म्हणून सांगणाऱ्या सरकारनेच वारकऱ्यांच्या माध्यमातून हिंदुत्वावर लाठीचार्ज केला. शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला केल्याची टीका यावेळी करण्यात आली. वारकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध असो, शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो, खोके सरकारचा निषेध असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,कृष्णा धुरी,बाळा कोरगावकर,संतोष शिरसाट,उदय मांजरेकर, सुशील चिंदरकर, योगेश धुरी,तालुका प्रमुख स्नेहा दळवी,श्रेया गवंडे,अक्षता खटावकर, दीपक आंगणे,सचिन काळप, राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, गंगाराम सडवेलकर,काका गावडे,बाळू पालव, दिनेश वारंग,बाळा पावसकर,अमित राणे,राजा पवार,गुरु गडकर,तुळशीदास पिंगुळकर,विनय गावडे,मंजू फडके, काका गावडे,अजित मार्गी,महेश वेळकर, गुंडू कुंभार, प्रकाश सावंत,नामदेव मेजारी,राघोजी झोरे, सुरेश सावंत,सूर्यकांत कदम,चंद्रकांत सावंत, प्रकाश कदम,संजय तावडे, पुनाजी पवार,प्रकाश चव्हाण, बाबल नांदोस्कर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + four =