You are currently viewing ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन

जिल्ह्यातील पहीलीच असलदे वृध्दाश्रमात

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत सरकार (MoSJE-GoI) मार्फत देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात येत आहे. राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (NISD),सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहीलाच शुभारंभ आज कणकवली तालुक्यातील असलदे स्वतिक फाउंडेशनच्या दिविजा वृध्दाश्रमात हेल्पलाईन प्रचार-प्रसिद्धीसाठी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी हेल्पलाईनचे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रीय प्रतिनिधी श्री प्रथमेश सावंत या हेल्पलाईनच्या कार्यप्रणाली बाबत माहिती दिली. या प्रसंगी असलदे गावचे सरपंच श्री. पंढरी वायगंणकर, उपसरपंच संतोष परब,पोलीस पाटील पाताडे ,आशा सेविका नरे, वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा सौ.दीपिका रांबाडे ग्रामस्थ संतोष घाडी , संतोष परब,प्रकाश शिंदे, अनिल परब, आत्माराम परब आदी मान्यवर तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 16 =