You are currently viewing भविष्यात विद्यार्थ्यांच्या उत्पन्नातून जिल्ह्याचा जीडीपी वाढेल – निलेश राणे

भविष्यात विद्यार्थ्यांच्या उत्पन्नातून जिल्ह्याचा जीडीपी वाढेल – निलेश राणे

भाजपच्या वतीने बारावीतील गुणवंतांचा सत्कार…

मालवण

आज विविध माध्यमातून जग जवळ आले आहे. जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी दहावी बारावी परीक्षेत राज्यात अव्वल बाजी मारत आहेत. मात्र ते पुढे कुठे जातात, कुठे नोकऱ्या करतात हे मात्र कळत नाही. विद्यार्थी हे जिल्ह्याचा जीडीपी आहे. हा जीडीपी वाढवून विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाच्या विविध वाटा दाखवल्यास भविष्यात याच विद्यार्थ्यांच्या उत्पन्नातून खऱ्या अर्थाने जिल्ह्याचा जीडीपी वाढेल. यासाठी आवश्यक ते सहकार्य पाठबळ देण्यास आपण सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी येथे केले.
शहरातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपा तर्फे सत्कार सोहळा आज येथील भाजप कार्यालयात भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दिपक पाटकर, जगदीश गावकर, पूजा करलकर, पूजा सरकारे, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, आबा हडकर, महेश सारंग, राजू बिडये, मोहन वराडकर, भाई मांजरेकर, दाजी सावजी, ललित चव्हाण, सुमित सावंत, प्रमोद करलकर, आबा धुरी, नरेंद्र जामसंडेकर, अभय कदम, राजू सावजी, दाजी सावजी, नारायण धुरी, कॅलीस फर्नांडिस, नमिता गावकर, दुर्गेश गावकर, विलास मुणगेकर, बाळू मालवणकर आदी उपस्थित होते.
यावेळी अतीकरेहेमान अन्सारी, मिहिका केनवडेकर, प्रेरणा कुबल, हर्षिता ढोके, अमृता वायंगणकर, करुणा हट्टीकर, तनुजा धुरी, कुणाल बिरमोळे, गौरवी हडकर, प्रेरणा पाताडे, भक्ती तेंडुलकर, पूजा पाडावे, पियुष चव्हाण, चिन्मय ढोके, ओम शिंदे, प्रथमेश आर्लेकर, मुस्कान शेख, यश पिळणकर, निकिता मेस्त्री, राहुल वालावलकर, निकिता शर्मा, दिव्या निकम, पौर्णिमा गावडे, सर्वेश कुबल, लोपेश कुबल, बिरु खरात या विद्यार्थ्यांचा श्री. राणे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. राणे म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण पालकांनी घेऊ द्यावे. विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण व करियर यावरील लक्ष ढळू देऊ नये. विद्यार्थ्यांनी बोलके बनले पाहिजे. कोणतेही आव्हान पेलण्यास विद्यार्थी सक्षम बनला पाहिजे. दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन होणे महत्वाचे आहे. खासदार असताना आपण करियर मार्गदर्शनाचे उपक्रम राबविले. आत पुन्हा करियर मार्गदर्शनाचे उपक्रम राबविणे गरजेचे बनले असून लवकरच आपण असा उपक्रम आयोजित करू तसेच आज सत्कार केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस उपयुक्त ठरणारा असा टॅब घरपोच दिला जाईल, असेही श्री. राणे यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर यांची समयोचित भाषणे झाली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांमधून हर्षिता ढोके व मिहिका केनवडेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक मार्गदर्शन कल चाचणीचे एका दिवसाचे शिबीर भाजप युवा मोर्चा मालवण यांच्यावतीने मालवण मध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =