You are currently viewing सावंतवाडी भोसले नॉलेज सिटीत २८ फेब्रुवारीला “सायन्स फेस्टिवल”…

सावंतवाडी भोसले नॉलेज सिटीत २८ फेब्रुवारीला “सायन्स फेस्टिवल”…

सावंतवाडी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारीला येथील भोसले नॉलेज सिटी येथे सायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी, पंचायत समिती सावंतवाडी व भोसले नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले असून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट एक्झिबिशनचे आयोजनही करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शन हे इयत्ता ६वी ते ८वी आणि ९वी ते १०वी अशा दोन गटात घेतले जाईल. विद्यार्थ्याना यावेळी वैज्ञानिक प्रतिकृतींची थ्री डी मॉडेल्स पाहण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या प्रदर्शनात तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार व भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले आहे. विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी विदयार्थ्यांनी नितीन सांडये ९८२३८६९१२८, अमर प्रभू ९४०३०५३३०३ यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा