You are currently viewing ” मोदी @ 9 अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने दिंव्यांगांना घरी जाऊन स्वावलंबन ( UDID ) कार्ड चे वाटप

” मोदी @ 9 अभियान ” अंतर्गत वेंगुर्लेत भाजपाच्या वतीने दिंव्यांगांना घरी जाऊन स्वावलंबन ( UDID ) कार्ड चे वाटप

वेंगुर्ले

 

३० मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभा मतदारसंघांत ” विशेष जनसंपर्क अभियान ” राबविण्यात आले . तसेच जिल्हा ,मंडल , शक्तीकेंद्र आणि बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम दिले होते .
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पाचही मंडलात विविध उपक्रम आयोजित करून अभियान यशस्वी केले . त्याचाच एक भाग म्हणून दिंव्यांगांना घरी जाऊन UDID कार्ड चे वाटप करण्यात आले .
विवीध शासकीय योजनांचा लाभ दिंव्यांगांना घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र ( UDID कार्ड ) आवश्यक आहे . मात्र वेंगुर्ले तालुक्यातील बहुतांश दिंव्यांग हे UDID कार्ड पासुन वंचित होते. ही अडचण लक्षात घेऊन भाजपा वेंगुर्ले च्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी दिंव्यांग प्रमाणपत्र व स्वालंबन कार्ड शिबिराचे आयोजन केले होते व त्यावेळेस जवळजवळ १५० दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेतला होता .सर्व तपासण्या एकाच ठिकाणी झाल्यामुळे दिंव्यांगांना प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले .
दिंव्यांगांना दैनंदिन जीवनात बरयाच अडचणींना सामना करावा लागतो. तसेच शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठीही त्रास सहन करावा लागतो. यासाठीच भाजपा च्या वतीने वेंगुर्ले ग्रामिण रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन केले होते व तालुक्यातील बरयाच दिंव्यांगांना UDID कार्ड मिळाले. या UDID कार्ड चे वाटप दिंव्यांग लाभार्थ्यांच्या घरी जाऊन करण्यात आले .
यावेळी उभादांडा – सुखटणवाडी येथील ख्रिस्ती समाजाचे सायमन किस्तु फर्नांडीस यांना त्यांच्या घरी जाऊन UDID कार्ड तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस यांच्या हस्ते देण्यात आले .तसेच दुसरे दिंव्यांग अनिल नाईक यांना ते चालवत असलेल्या चहाच्या स्टाॅलवर देण्यात आले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , ता.सरचिटनिस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष प्रीतेश राऊळ , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , बुथ प्रमुख आनंद मेस्त्री , ग्रामपंचायत सदस्या सौ.अस्मिता मेस्त्री इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + six =