भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील पाल – गोडवणेवाडी कंटोनमेंट झोन निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशक सुपूर्द

भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील पाल – गोडवणेवाडी कंटोनमेंट झोन निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशक सुपूर्द

वेंगुर्ला
भाजपाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील पाल ग्रामपंचायत हद्दीतील गोडवणेवाडी येथील कंटोनमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणासाठी जंतूनाशकाचा मोफत पुरवठा केला.पाल – गोडवणेवाडी येथील जगदंब ग्रुप यांचेकडे दोन कॅन जंतूनाशक सुपूर्द केले .
वेंगुर्ले तालुक्यामध्ये ग्रामीण भागात शासनाने कंटोनमेंट झोन जाहीर केले. परंतु कंटोनमेंट झोन निर्जंतुकीकरणासाठी कोणतीही तरतूद केली नाही. तसेच ग्रामपंचायतीही सक्षम नसल्याने युवक मंडळे पुढाकार घेऊन आपआपली वाडी कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत .

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की ज्याप्रमाणे कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी सेवाकार्य केले होते त्याचप्रमाणे दुसरया लाटेमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेला थेट मदत करावी. तसेच कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी योग्य निर्बंध पाळले जावेत, यासाठी स्थानिक पातळीवर विविध वाडी – वस्त्यांमध्ये युवकांची ” कोवीड अनुशासन कमीट्या ” बनवाव्यात अशी महत्त्वाची सुचना मान.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.याच अनुषंगाने गावातील वाड्यांमध्ये अशा प्रकारच्या समित्या बनवुन लोकांना भाजपा च्या वतीने मदत करणार असल्याचे प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी सांगितले .
यावेळी तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, शक्ती केंद्र प्रमुख कमलेश गावडे, ओंकार गावडे, गौरव गावडे, हेमंत आंगचेकर, किरण आंगचेकर, पिंट्या गावडे, गुरु गावडे, लीलु गावडे, बबलु गावडे,  सुजल वारंग, सुजल शेटकर इत्यादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा