You are currently viewing अन्न पदार्थ वर्तमानपत्राच्या वेष्टनात देण्यास बंदी

अन्न पदार्थ वर्तमानपत्राच्या वेष्टनात देण्यास बंदी

अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 नुसार दाखल होऊ शकतो गुन्हा

 सिंधुदुर्गनगरी

वर्तमानपत्र छपाईसाठी रासायनिक शाईचा वापर केला जाते. ही शाई माणसाच्या आरोग्यास घातक आहे. त्यामुळे वर्तमानपत्रा मध्ये भेळ, वडापाव, भजी यासारखे पदार्थ बांधून देण्यास बंदी करण्यात आली आहे. असे केल्यास सदर व्यावसायिकावर अन्न सुरक्षा व मानवी कायदा 2006 नूसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अशी माहित अन्न व ऑषध  प्रशासनाचे सहायक आयुक्त तु.ना. शिगाडे यांनी दिली.

            रासायनयुक्त शाई मानवी आरोग्यास धोकादायक व हानिकारक आहे. त्यामुळे अशा घातक रसायनयुक्त शाईने छापलेल्या वर्तमानपत्राचा कागदामध्ये गरम पदार्थ बांधून देणे ग्रहकांना धोकादायक ठरू शकते. त्याचबरोबर खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करणाऱ्या हातगाडी, फरसाण उत्पादक, स्विट मार्ट धारक,मोठे हॉटेल्स, कॅटरर्स इत्यादी अन्न व्यावसायिकांनी देखील दोन ते तीन वेळा वापरलेले आणि काळे पडलेले खाद्यतेल हे पुन्हा अन्न पदार्थ तळण्यासाठी वापरु नयेत, असे काळे पडलेले तेल हे आरोग्यासाठी घातक असते. असे तेल हे इतरत्र फेकून पर्यावरणाची देखील हानी होतो, त्यामुळे हे तेल फेकून न देता ते जमा करुन केंद्र शासन प्राधिकृत बायोडिझेल कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी यांना द्यायचे आहे. या तेलाचा मोबदला अन्न व्यावसायिकांना सदर बायोडिझेल उत्पादक कंपनीकडून देण्यात येणार आहे. असे निर्देश केंद्रिय अन्न सुरक्षा प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडून प्राप्त झालेले आहेत.

            तरी सर्व अन्न व्यावसायिक छोटे मोठे हॉटेल्स, बेकरी व्यावयायिक,स्नॅक्स सेंटर, स्वीट मार्ट, वडापाव,कॅटरर्स, फरसाण उत्पादक, भजी व भेळ विक्रेते इत्यादी अन्न व्यावसायिक यांना सूचित करण्यात येते की, वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्न पदार्थांचे पॅकिंग त्वरित बंद करावे तसेच दोन- तीनदा वापरलेल्या खाद्यतेलाचा अन्न पदार्थ तळण्यासाठी पुन्हा वापर करु नये. अन्यथा त्यांचेविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत योग्य ती कारवाई घेण्यात येईल याची नोंद घ्यावी असे ही अन्न व औषध प्रशासन सिंधुदुर्ग यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + twelve =