नगराध्यक्षाची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या…

नगराध्यक्षाची दिवसाढवळ्या गळा चिरून हत्या…

 

 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. या क्रूर घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. हत्येच्या घटनेनंतर स्वःता मारेकरी  पोलीस ठाण्यात हजर झाला.

 

 

मोठे बंधू शेखर यांच्या बाराव्याचे श्राद्ध विधी सुरू असताना धनंजय तुंगार यांना फोन आला. त्यामुळे ते अहिल्या धरणाकडे गेले. तेथे आधीच दबा धरून बसलेल्या. समीर गोंदके असं या संशयिताचे नाव आहे. समीर हा गांज्याच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. धनंजय हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

*कुटुंबावर तिसरा आघात*

 

त्र्यंबकेश्वरच्या जडणघडणीत तुंगार कुुटुंबीयांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषविलेले यादवराव तुंगार यांचे याचवर्षी मार्चमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले तर त्यापाठोपाठ यादवराव यांचे ज्येष्ठ पुत्र शेखर ऊर्फ शिवाजीराव यांचे १० आॅक्टोबरला निधन झाले. त्यांच्या निधनाला १२ दिवस उलटत नाही तोच बुधवारी धनंजय तुंगार यांची चाकूने हत्या करण्यात आली. तुंगार कुटुंबावर आठ महिन्यांच्या काळात हा तिसरा आघात आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा