You are currently viewing उद्या 28 ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराजांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा

उद्या 28 ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराजांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा

कुडाळ:

 

पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज यांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा 28 ऑक्टोबर रोजी (कोजागिरी पौर्णिमा ) करण्यात येणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

27 ऑक्टोबर रोजी 4 ते 6 या वेळेत सी अध्याय वाचन – वर्णावी ती थोरवी, 28 रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत अध्याय वाचन समाप्त, 28 रोजी पहाटे 5 वाजता काकड आरती, सकाळी 7 वाजता प पू.राऊळ महाराज समाधीस्थानी अभिषेक, 10 वाजता प.पू.राऊळ महाराज भजन मंडळ ( मुंबई ) यांचे गायन , 11 वाजता प.पू. विनायक (अण्णा ) राऊळ महाराज यांच्या समाधीस्थानी अभिषेक तसेच प.पू.महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आरोग्य उपक्रमांतर्गत गरजू लाभार्थींना आर्थिक सहाय्य करणे, दुपारी 12 वाजता महाराजांची आरती दुपारी 1 ते रात्री दहा वाजेपर्यंत अखंड महाप्रसाद दुपारी 1 वाजता दत्तगुरु मंडळ (कासार्डे )बुवा प्रकाश पारकर यांचे भजन, 2.30 वाजता प.पू.राऊळ महाराज धार्मिक वेदोक्त – जन्मोत्सव व सुनसिनीच्या हस्ते पाळणा झोका, 3.30 वाजता प. पू नामदेव महाराज मंडळाचे नामस्मरण भजन ,सायंकाळीं 5.30 वाजता प. पू. राऊळ महाराज महिला मंडळ याचे भजन ,7 सांजआरती ,7.30 वाजता प.पू राऊळ महाराज यांच्या पादुकांची पालखी मिरवणूक , रात्री 10 वाजता राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन आदी कार्यक्रम होणार आहेत, उपस्थित राहण्याचे आवाहन प. पू राऊळ महाराज सेवा ट्रस्ट विश्वस्त मंगळ (पिंगुळी) चे कार्याध्यक्ष विठोबा राऊळ व समस्त राऊळ महाराज भक्त परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा