You are currently viewing पर्यटक, सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका

पर्यटक, सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नका

*जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या ट्राफिक पोलिसांना सूचना*

 

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग…!

गोवा राज्याच्या सीमेवर असलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पर्यटन राज्य गोव्याचं मुख आणि गोव्यापेक्षाही स्वच्छ व सुंदर असे समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्य सिंधुदुर्ग जिल्ह्यास लाभले आहे. त्यामुळे देश विदेशातून गोवा फिरायला येणारे पर्यटक आवर्जून सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देतात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतात.

सिंधुदुर्ग जिल्हा ट्रॅफिक पोलिसांकडून कित्येकदा पर्यटकांच्या गाड्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार घडतात त्याचबरोबर सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने अनेकदा आपल्या पाल्याला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी सर्वसामान्य पालक वर्ग दुचाकीने वेळेत पोहोचण्यासाठी धावपळ करीत असतो अशावेळी काही वेळा पोलिसांकडून नियमांवर बोट ठेवून सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचे प्रकार घडतात त्यातून वाद उत्पन्न होतात आणि सोशल मीडिया आदी माध्यमातून पोलिसांकडे बोट दाखवले जाते. सध्या सुरू होणारा पर्यटन हंगाम आणि शालांत परीक्षांचे दिवस यामुळे ट्राफिक पोलिसांकडून पर्यटक तसेच सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी ट्रॅफिक पोलिसांची मीटिंग घेऊन केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 5 =