You are currently viewing हिंदी चित्रपट गीता मध्ये अध्यात्म किंवा तत्व चिंतन

हिंदी चित्रपट गीता मध्ये अध्यात्म किंवा तत्व चिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शलोमित खान लिखित अप्रतिम लेख*

 

*हिंदी चित्रपट गीता मध्ये अध्यात्म किंवा तत्व चिंतन*

 

वरील विषय वाचतात आपल्या लक्षात आलेच असेल की आज मी कोणता विषय घेऊन आपल्यासमोर आले आहे. आज मी थोडासा वेगळा विषय घेऊन माझा लेख लिहीत आहे. खरंतर हिंदी चित्रपट गीतांमध्ये इतकी विविधता आहे की त्यातला कोणता विषय निवडायचा यामध्येच माणूस गुंतून जातो. जवळजवळ सर्वच विषय हिंदी चित्रपट गीतांमध्ये वर्णिलेले आपल्याला दिसून येतात. या गीतात सर्वात जास्त गीते ही प्रेमगीते आहेत प्रेमाच्या दोन्ही बाजू म्हणजे मिलन आणि विरह यांच्यावर जास्तीत जास्त लेखन केलेले आपल्याला दिसून येईल. पण त्याशिवाय यापूर्वी आपण विचार केलेले विषय म्हणजे हास्य गीते रेल्वेच्या प्रवासातील गीते स्त्रियांच्या अलंकाराविषयीची गीते असे अनेक प्रकार पाहिले. याशिवाय यात्रेविषयी घेते भक्ती गीते, नायक नाईकांची एकमेकाला छेडणारी गीते, वेगवेगळ्या पक्षांवरली उदाहरणार्थ कोयल कागा मोर तोता मैना ही पक्षांवर ची गाणी तर हरीण घोडा कुत्रा मांजर ससा वाघ हत्ती यांच्यावर देखील गीते लिहिलेली आपल्याला दिसून येतात. तसेच निसर्ग आणि त्याची त्यामधील अनेक गोष्टी उदाहरणाचा पर्वत नद्या समुद्र झाडे फुले पाने गळ्या चंद्र तारे इत्यादी अनेक विषयांवरची गाणी ही आपण पाहतो किंवा ऐकतो. स्त्री सौंदर्य विषयीची तर असंख्य गाणे आपल्याला दिसून येतात विशेष करून तिचा रंग रूप डोळे केस तिची चाल यावर जास्तीत जास्त गाणे लिहिलेली आहेत. विषय काढायचे झाले तर असंख्य विषय डोळ्यासमोर येतात पण मी आता त्या सर्व विषयांना नजरे आड करून माझ्या विषयाकडे वळते.

हिंदी चित्रपटातील गाणी हे फक्त प्रेमाची गाणी आहेत असे अनेक लोकांचा गैरसमज आहे. मी वरती सांगितल्याप्रमाणे अनेक विषयांवर येथे लिहिलेले आहे आणि विषयांना शब्दांना कल्पनेला कुठलीच मर्यादा नाही. आता जो विषय मी आपल्या पुढे मांडत आहे तो विषय आहे हिंदी चित्रपट गीतामधील अध्यात्म.

या हिंदी गीतांमध्ये आपल्याला अनेक गाणे अशी आढळून येतील कि ती आपल्याला काही ना काही शिकवून जातात. जीवनाची वास्तविकता जीवनाचे सत्.य आणि जीवनातील अध्यात्म याविषयी अत्यंत सुरेख पद्धतीने अनेक गीतकारांनी आपले लेखन कार्य केलेले आहे.

अगदी मागे मागे मागे गेल्यानंतर सर्वात पहिले माझ्या कानावर जे गीत पडते ते गीत आहे प्रसिद्ध नायक

आणि गायक के एल सैगल यांचे जे त्या काळात अत्यंत लोकप्रिय झाले होते आणि आजही लोक त्याला आवडीने ऐकतात. ते गाणे आहे

बाबुल मेरा नैहर छुटली जाए

चार कहार मेरी डोलिया उठाये रे मेरा अपना बेगाना चोट लग जाए।

हे ते गाणे जे वरवर पाहता साधेसुधे गाणे एका सासरी चाललेल्या मुलीच्या भावना असलेले गाणे वाटते पण ते तसे नाही आहे. इथे आत्मा बोलत आहे की हे जग माझे माहेर आहे ते माझ्यापासून दूर जात आहे. चार पालखी वाल्यांनी माझी पालखी उचलून धरली आहे आणि हळूहळू माझ्या मना मधून आपला पराया हा भाव मिटत चाललेला आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती जो या जगात जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस परत परमेश्वराकडे जावेच लागते. हे विश्व त्याचे माहेर आहे आणि त्याला आपल्या सासरी म्हणजेच परमेश्वराकडे जायचे आहे.

अगदी याच प्रकारचे आणखी एक गाणे मला आठवते आहे तो चित्रपट आहे दिल ही तो है ज्यादा राज कपूर आनी नूतन प्रमुख भूमिका आहेत. आणि ते गाणे आहे

लागा चुनरी मे दाग छुपाऊँ कैसे, घर जाऊ कैसे

लागा चुनरी मे दाग

परमेश्वर आपल्याला अत्यंत स्वच्छ आणि पवित्र आत्मा देऊन पृथ्वीवर पाठवतो पण आपण अनेक गुन्हे अपराध करून आत्म्याच्या वस्त्राला कलंकित करतो त्याच्यावर डाग लावतो म्हणूनच आत्मा जणू आपला पश्चाताप व्यक्त करतोय हे माझ्या बसला डाग लागला आहे आता मी परत कशी जाऊ आणि त्यांना माझे हे कलंकित वस्त्र कसे दाखवू?

अशाप्रकारे या गीतामध्ये देखील आत्म्यआला सासरी जायचे आहे पण वस्त्राला डाग लागला आहे तर मी कशी जाऊ हा लागलेला डाग कशी लपवू असा प्रश्न तिला पडलेला आहे. याप्रसंगी मला मराठीचे एक अत्यंत गाजलेले गाणे आठवते आहे जे हरहुन्नरी गायिका आशा भोसले यांनी गायले आहे आणि गाण्याचे बोल आहेत

जिवलगा राहिले रे दूर घर माझे

पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे.

या गाण्यात देखील हाच भाव आपल्याला पाहायला मिळतो. यामध्ये जीवन हा एक प्रवास आहे जो माणसाला चालत चालत पूर्ण करावा लागतो. सुरुवातीला आनंदाने आणि उत्साहाने सुरू केलेला हा प्रवास हळूहळू माणसाला दुःख आणि त्रास देऊ लागतो त्याला थकवा जाणवू लागतो कारण जीवनाचे असंख्य अनुभव घेऊन तो चालत असतो त्या अनुभवांचे ओझे आता त्याच्याने पेलवत नाहीत तो खूप थकून जातो मागेही जाता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही अशी काहीशी स्थिती होते तेव्हा तो परमेश्वराला अर्थ हाक मारतो हे माझ्या जिवलगा हे माझ्या प्रिय परमेश्वरा आता मला हा भार सोसवत नाही माझी पावलं थकली आहेत माझे घर दूर राहिलेले आहे तेव्हा मला मदत कर आणि या परिस्थितीतून माझी सुटका कर असाच भाव या गाण्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. आपण जर मराठी गीतांकडे एक नजर टाकली तर अशी अध्यात्म सांगणारी अनेक गीते आपल्याला दिसून येतील पण आज आपण त्यांच्यावर चर्चा न करता फक्त हिंदी चित्रपटांमधून आलेली काही गाणी पाहणार आहोत यामध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. मी पुन्हा एकदा तेच गाणे सांगत आहे जे आपण मागील माझ्या लेखात पाहिलेले आहे आणि ते गाणे आहे कारण देवी यांनी गायलेले तुफान मेल दुनिया ये दुनिया तुफान मेल. या गाण्यांमध्ये कवीने जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे की हे आयुष्य एखाद्या रेल्वे प्रवासासारखे आहे कारण या रेल्वेमध्ये आपल्याला कायमचे बसायचे नाही जेथे आपले उतरण्याचे ठिकाण येईल तेथे आपल्याला उतरावेच लागेल कारण आपले तिकीट फक्त त्याच ठिकाणापुरते होते. आपला थांबा आला की उतरावे लागते. जोपर्यंत आपला जीवनाचा प्रवास चालू आहे तोपर्यंतच आपण ही यात्रा करू शकतो जेथे आपले तिकीट संपते तेथे यात्रा संपवून जावे लागते हेच अंतिम सत्य आहे. येथे मला बहादूर शाह जफर यांच्या चित्रपटातील हे गाणे आठवत आहे अर्थातच बहादूर शाह ह जफर यांनी स्वतःच केलेले आहे आणि ते गाणे आहे

लगता नहीं है दिल मेरा उजड़े दयार में

या गाण्यात पुढे ते म्हणतात

उम्र दराज मांग के लाए थे चार दिन

दो आरजू में कट गए दो इंतजार में।

येथे देखील मनुष्य जीवनाची नश्वरता अधोरेखांकित केलेली दिसते आहे. माणसाची जीवन किती असते तर फक्त चार दिवसांचे आणि त्यातीलही दोन दिवस इच्छा करण्यात म्हणजे मला हे पाहिजे ते पाहिजे असा विचार करण्यात जाता त आणि राहिलेले दोन दिवस प्रतीक्षा करण्यात जातात की जे मी मागितले ते मला कधी मिळेल आणि या सर्व भावभावनेत जीवन संपून जाते याचे त्याला भान राहत नाही. परंतु जीवनाचा सर्वात जास्त आध्यात्मिक विचार साहीर लुधियानवी यांनी आपल्यासमोर ठेवला आहे जीवन कसे जगावे याचे अत्यंत सुंदर तत्त्वज्ञान ते आपल्याला सांगतात हे गाणे आहे चित्रपट हम दोनो मधील देवानंद यांनी गायलेले

मै जिंदगी का साथ निभाता चला गया

हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया।

जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया

जो खो गया मैं उसको भूलाया चला गया।

कितनी सुंदर तत्वज्ञान आहे जीवन जगण्याचे. जीवन जगत रहावे आनंदाने मस्तीने जशा कशा प्रकारे जीवन मिळते त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा कोणतीही तक्रार करू नये कशाचीही काळजी करू नये आलेली काळजी उडवून लावावे. जे मिळाले त्यात आनंद मानावा जे नाही मिळाले त्याला सोडून द्यावे विसरू न जावे. यापेक्षा जास्त चांगले विचार जीवनाविषयी काय असू शकतात?

असेच एक अतिशय सुंदर गाणे मला आठवत आहे जे राज कपूरने आपल्या अदाकारीने अमर केले आहे परंतु त्या गाण्याचे बोल आणि संगीत या दोघांनाही त्याच्या लोकप्रियतेचे श्रेय द्यावे लागेल हे गाणे देखील खूप लोकप्रिय आहे.

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार

किसी का दर्द मिल सके तो ले उधार

किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार

जीना इसी का नाम है।

किती सहज सोप्या आणि सुंदर पद्धतीने जीवन कसे जगावे हे तत्वज्ञान सांगितले गेले आहे. जर तुला कोणाला हसवायची संधी मिळाली तर सोडू नकोस एखाद्याला हसवण्यासाठी आपले आयुष्य देखील ओवाळून टाक, जर कोणाचे दुःख तू घेऊ शकत असेल तर ते दुःख तू घे आणि त्याला बदल्यामध्ये सुख दे, कोणासाठी तुझ्या मनामध्ये प्रेम असेल तर समज तुझे जीवन सार्थकी लागले कारण जीवनाचा अर्थच हा आहे. किती सुंदर किती अर्थपूर्ण जीवनाचे हे तत्त्वज्ञान कवी सांगून जातात. राज कपूर यांचा आणखी एक चित्रपट मला आठवतो आहे श्री 420

या चित्रपटात अगदी सहज चालता चालता नायक म्हणून जातो

चल ना जीवन की कहानी

रुक ना मौत की निशाणी

अगदी खरं आहे जोपर्यंत माणूस चालतो काम करतो तोपर्यंतच जेवणाला अर्थ आहे नाहीतर जगलो काय आणि मेलो काय दोन्हीही सारखेच. असे म्हटले जाते की जोपर्यंत पाणी वाहत आहे तोपर्यंत स्वच्छ आहे पवित्र आहे पण जर पाणी वाहता वाहता एका जागी थांबले तर त्याच्यावर शेवाळ येऊ लागतो ते पाणी निरर्थक होऊन जाते कोणाच्याही कामाला येत नाही. जीवन देखील असेच आहे तोपर्यंत तुम्ही चालता आहात कोणासाठी काहीतरी करत आहात तोपर्यंत जीवनाला अर्थ असतो नाहीतर ते जीवन निरर्थक होऊन जाते.

जीवनाला प्रेरणा देणारी अशी अनेक गाणी आपल्याला चित्रपटांमध्ये आढळून येतात. उदाहरणे द्यायचे म्हटले तर ही गाणी पहा

रुक जाना नही तू कही हार के

कांटों पर चल के मिलेंगे साये बहार के। इम्तिहान या चित्रपटातील विनोद खन्ना ने गाय ले ले हे गाने आहे

चित्रपट आरती

कलाकार मीना कुमारी, प्रदीप कुमार, अशोक कुमार

कभी तो मिलेगी कहीं तो मिलेगी बहारों की मंजिल राही।

या गाण्यात देखील निराश झालेल्या आपल्या प्रेमीला प्रेमिका जीवनाच्या कडे आशावादी दृष्टीने पाहायला सांगते की एक ना एक दिवस सुखाचे दिवस येतील.

अशाच प्रकारचे आणखी एक गाणे फिर सुबह होगी या चित्रपटातील

राज कपूर माला सिन्हा रहमान है कलाकार आने गाने आहे

वह सुबह कभी तो आएगी।

तसेच पुढील गाण्यात असे सांगितले आहे की तू जीवनाचा हा रस्ता चालत राहा कोणी तुझ्याबरोबर आले तर फार चांगले नाही तर एकटाच चालत रहा चालत राहा थांबू नकोस.

चल अकेला चल अकेला चल अकेला

तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला।

तेरा कोई साथ ना दे तो तू खुद से प्रीत जोड़ ले

बिछौना धरती को कर ले अरे आकाश ओढ़ ले

है कौन सा इंसान जिसने यहां दुख ना झेला।

या गीतातूनही कवीने हेच सांगितले आहे की जीवन प्रवास चालू राहिला पाहिजे कोणी साथ येऊ दे किंवा नाही येऊ दे तू एकटाच चालत रहा.

आयुष्याचे हे तत्त्वज्ञान वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. आता मी प्रत्येक गाण्याचे विश्लेषण न करता आणि त्याच्या मागील पार्श्वभूमी न सांगता काही गाणे एका मागोमाग एक आपल्यासमोर ठेवत आहे ज्यामध्ये आपल्याला दिसून येईल की जीवनाकडे पाहण्याचा प्रत्येक कविचा दृष्टिकोण एक मेका पासून भिन्न भिन्न आहे.

जिंदगी इत्तेफाक है कल अभी इत्तेफाक का थी आज भी इत्तेफाक है।

जिंदगी एक सफर है सुहाना

यहां कल क्या हो किसने जाना

जिंदगी कैसी है पहेली हाय

कभी तो हसाए कभी यह रूलाये

जिंदगी की सफर में गुजर जाते हैं जो मकाम

वह फिर नहीं आते वह फिर नहीं आते।

एक रास्ता है जिंदगी जो थम गई तो थम गई

मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया

ना कोई उमंग है ना कोई तरंग है

मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है

जीवन के सफर में राही मिलते हैं बिछड़ जाने को

और दे जाते हैं यादें तनहाई में तड़प आने को।

तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं

तेरे मासूम से सवालात पे परेशान हूं मैं।

जिंदगी है क्या सुन मेरी जान

प्यार भरा दिल मीठी जुबान

जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी अशी अनेक गाणे शोधून पाहिली तर सापडतील. पण मला येथे फक्त जीवनावरच नाही बोलायचे तर या हिंदी गीतातून व्यक्त झालेल्या अनेक तत्त्वदर्शक विचारांवर बोलायचे आहे. त्यातील पहिले गाणे आहे धूल का फूल या चित्रपटातील जे आजच्या परिस्थितीत देखील लागू होते अत्यंत गाजलेले हे गाणे

तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा

इंसान की औलाद है इंसान बनेगा।

माणसा माणसातील धर्माच्या भिंती ढासळून लावणारे हे गाणे काला तीत आहे कुठल्याही युगामध्ये हे गाणे तितक्याच आवडीने ऐकले जाईल आणि तितक्यात ताकतीने ते आपल्या तत्त्वज्ञानाला व्यक्त करीत राहील

जिसमे ना हो कुरान वह मंदिर नहीं तेरा

जिसमें ना हो गीता बहुत तेरा हरम नहीं है।

पहा साहिर जिने किती उच्च विचार व्यक्त केले आहेत. ज्या मंदिरामध्ये कुराण नाही ते मंदिर तुझे नाही आणि ज्या मशिदीमध्ये गीता नाही ती मशीद ही तुझी नाही असे विचार करण्यासाठी अत्यंत उदारमतवादी असणे आवश्यक आहे.

जीवन कितीही कठीण असू दे ते हसत हसत जगले पाहिजे असे एक मित्र दुसऱ्या मित्राला समजावतो. दोस्त या चित्रपटातील हे गाणे पहा

पहनकर पांव में जंजीर भी

रक्स किया जाता है

आ बताएं तुझे कैसे जिया जाता है।

मित्रा अरे पायात जरी साखळदंड पडले तरी नाचावे लागते आणि असा करणारा खऱ्या अर्थाने जगतो हे सांगणार हे गीत जीवनाचा आणि तो जगण्याचा मंत्र देऊन जातो.

त्याचप्रमाणे किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे देखील जीवन कसे जगावे हे सांगून जातात

प्यार बांटते चलो प्यार बांटते चलो

क्या हिंदू क्या मुसलमान हम सब है भाई भाई

प्यार बांटते चलो।

तर दुसरीकडे राज कपूर तिसरी कसम या चित्रपटात जीवनाचे रहस्य उलगडून सांगतात

सजन रे झूठ मत बोलो

खुदा के पास जाना है

ना हाथी है ना घोड़ा है

वहां पैदल ही जाना है।

हे मानवा खोटे बोलू नकोस एक दिवस परमेश्वराला तोंड दाखवायचं आहे तेव्हा तू काय करशील त्यावेळी तुझे वैभव तुझे नाव तुझा मान मरातब तुझी कीर्ती काही काही उपयोगाचे नाही. तेथे ना घोड्यावर बसून जाता येते ना हत्तीवरून बसून जाता येते तेथे सर्वांनाच चालत जावे लागते. एक साधासुधा बैलगाडा हाकणारा हा सच्चा माणूस जीवनाचे तत्त्वज्ञान सांगून मोकळा होतो.

तर पुढील गीता मध्ये जीवनाचे हे सत्य सांगितले आहे की मन हा आरसा आहे त्यामध्ये तेच प्रतिबिंब पडेल ज्याप्रमाणे तुम्ही वागता आहात कर्म करीत आहात. त्या आरशाला कोणी फसवू शकत नाही.

तोरा मन दर्पण कहलाए

भले बुरे सारे कर्मों को देखें और दिखाएं।

तर पुढच्या गाण्यात कवी म्हणतात की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे धनदौलत आहे नाव आहे प्रसिद्धी आहे तोपर्यंत इतर लोक तुमच्या जवळ येतील मित्र बनतील नातेवाईक बनतील पण एकदा का तुम्ही निर्धन झालात दुखी झालात तर तुमचा साथ द्यायला कोणीच येणार नाही फक्त परमेश्वरच अशावेळी तुमची मदत करतो.

सुख के सब साथी दुख में न कोई

मेरे राम मेरे राम तोर नाम एक साचा दूजा ना कोई।

आता मी आपल्याला वेळेचे महत्व किंवा काळाचे महत्व सांगणारे काही गाणे सांगते आहे जे अधोरेखित करतात की माणसाच्या हातात काही नसते जे काही होते ते काळाच्या मर्जीवर अवलंबून असते.

वक्त से दिन और रात

वक्त से कल और आज आज

वक्त का हर शै गुलाम

वक्त का हर शै पे राज

दूसरे गाने आहे

आने वाला पल जाने वाला है

सोचो तो इस में जिंदगी बिता लो, पल जो जाने वाला है।

तीसरी गाने आहे

आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू

जो भी है बस यही एक पल है।

किती अर्थपूर्ण तत्त्वज्ञान या गाण्यांमधून प्रकट झाले आहे.

पहिल्या गीतामध्ये वेळेचे महत्त्व सांगताना कवी म्हणतात की कोणीही स्वतःवर अभिमान करू नये कारण कधी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही ह्या सर्व गोष्टी फक्त आणि फक्त काळाच्या हातात आहेत त्याला पाहिजे तर तो राजाला भिकारी आणि भिकारीला राजा क्षणभरात करू शकतो.

दुसऱ्या गाण्यात कवी म्हणतात येणारा प्रत्येक क्षण जाणारा असतो म्हणून तुला जे काही करायचे आहे ते या क्षणात करून घे याच क्षणात जगून घे कारण हा क्षण जाणार आहे परत येणार नाही.

तिसऱ्या गाण्यातही काहीसा हाच भाव आहे

हे माणसा भविष्यात काय होईल हे तुला माहीत नाही

भूतकाळात जे झाले तेही तुला माहीत नाही तेव्हा जे काही आहे ते या क्षणातच आहे. तुला जे काही करायचे आहे ते या क्षणात कर कारण हाच क्षण तुझ्या हातात आहे तो निघून गेला की निघून गेला मग तुला काहीच करता येणार नाही. यावेळी मला हिंदी संत कवी कबीरांचे बोल आठवतात

कल करे सो आज कर आज करे सो अब

पल में प्रलय होगा बहुरि करेगा कब।

हा लेख बराच लांबला आहे याची मला कल्पना आहे तरी देखील मी अनेक गाणी सोडून दिली अनेक गाण्याचे अर्थही सांगितले नाहीत तरी देखील मारुतीच्या शेपटाप्रमाणे हा लेख वाढतच गेला. शेवटी दोन गाणी मी आपल्याला सांगणार आहे ज्यामध्ये आशावादी दृष्टिकोन आहे. जीवनाचे हे सर्व तत्त्वज्ञान पाहून निराश होण्याचे कारण नाही कारण आज नाहीतर उद्या आशेचा किरण आपल्या जीवनात प्रवेश करणारच आहे म्हणून निराश न राहता आशावादी दृष्टिकोन ठेवून जीवन जगले पाहिजे हे समजावणारे ही दोन गाणी

बदल जाये अगर माली चमन होता नहीं खाली

बहरें फिर भी आती है बाहर है फिर भी आएगी।

दूसरे गाने आहे

गम की अंधेरी रात में दिल को ना बेकरार कर

सुबह जरूर आएगी सुबह का इंतजार कर।

मित्रांनो रसिकांनो मी आता येथे थांबते. जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारी ही सर्व गाणी आणि त्यावरील माझे विवेचन आपल्याला कसे वाटले नक्की अभिप्राय देऊन कळवा मी आपल्या अभिप्रायाची प्रतीक्षा करेन.

 

साकव्य मीत शलोमित

प्रतिक्रिया व्यक्त करा