*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”नंदीबैल”*
नंदी भगवान शंकराचे वाहन परमभक्त
शंकराच्या मंदिरात देवासमोर विराजमानIIधृII
प्रथम द्वारपालाचे दर्शन मग शिवदर्शन
नंदीच्या कानात ईच्छा सांगता पोहोचे देवापर्यंत
नंदीबैल श्रद्धेच प्रतीक आहे पवित्र सशक्तII1II
निष्ठा संयम सेवक सामर्थ्यवान आज्ञावान
शेती कामात बैलांचा उपयोग होतो बहुविध
कृषीवालाचा खरा सोबती म्हणून विशेष स्थानII2II
भक्तीनिष्ठ नम्रता संयम सेवाभाव द्योत
गोवंश करतो वृद्धिंगत गोमय मूत्र खत
शंकर चरणी पूर्ण समर्पण दावी शिकवणII3II
एक गण वीरभद्र अवतारात प्रमुख स्थान
गोपाष्टमीला गाईगुरे चरायला नेल्या कृष्णानं
पोळा सणाचे दिवशी करितात शृंगार पूजनII4II
नंदी शिवाचा सेवक आहे भक्तीचा सागर
शिवचरणी राहून करितो भक्तीचा जागर
शिवनामाचा महिमा गाऊ करू नंदीला वंदनII5II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत.रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
