You are currently viewing मिशन आयएएसच्या कार्याध्यक्षांना प्रेरणा पुरस्कार

मिशन आयएएसच्या कार्याध्यक्षांना प्रेरणा पुरस्कार

 

अमरावतीच्या मिशन आयएएस या संस्थेचे कार्याध्यक्ष व महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाचे (GST) माजी उपआयुक्त श्री. मेहबूब कसार यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठेचा ‘डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला. सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत कार्य करण्याचा अनुभव असलेले मा.डॉ. अशोक नगरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन, डॉ. कलाम कौशल्य विकास केंद्र आणि सेवा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सन्मानामुळे आनंदित झालेले श्री. मेहबूब कसार यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत.

 

प्रशासकीय सेवेत दीर्घकाळ काम केल्यानंतर निवृत्तीनंतरही मिशन आयएएस असेच इतर सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रात सक्रिय राहून समाजासाठी योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांना प्रोत्साहन देणे आणि समाजोपयोगी उपक्रमांना हातभार लावणे या कार्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे

डॉ. कलाम यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या या सन्मानामुळे त्यांच्या पुढील सामाजिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या कार्याला निश्चितच नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल मिशन आयआयचे सरचिटणीस प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवेंद्र खडसे व महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा