*जागतिक साकव्य विकास मंच सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम लावणी*
टिकली वाजली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !
अन सखे माझ्या,
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !!
राम आला अयोध्येत, दीपपंक्ती सजली !
तमावर तेजाची गाथा, तेव्हाच लिहिली गेली !
नगरीत आनंदाची, लहर अशी उठली !
अन सखे माझ्या,
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !!
लक्ष्मी आली अंगणी, कुंकुम पावले रेखीत !
अलक्ष्मी गेली दारातून, मान वाकवून देखत !
समृद्धीची अदलाबदल, डोळ्यांनी मी पाहिली !
अन सखे माझ्या,
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !!
किल्ल्यावर बालपणी, शिवबा लढताना दिसायचा !
पणतीच्या तेलात मला, देवच भासायचा !
टिकलीच्या आवाजावर, भावंडे आनंदाने नाचली !
अन सखे माझ्या,
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !!
स्क्रीनच्या प्रकाशात, पणतीची ज्योत विरली !
कुरियरच्या फराळात, आईच्या हातची चव हरली !
तरी मनाच्या कोपऱ्यात, एक आठवण जपून उरली !
अन सखे माझ्या,
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !!
मनाच्या गाभाऱ्यात, पुन्हा एकदा दिवा लावा !
बाहेरचा नव्हे अंतरातील, अंधार उजळावा !
जीव-शिवाचे ऐक्य हीच, शिकवण संतांनी शिकविली !
अन सखे माझ्या,
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
ए सखे माझ्या, काळजात दिवाळी भरली !!
टिकली वाजली गं सखे, अंगणी दिवाळी सजली !!
श्री. प्रभाकर भामरे ‘इंदुमाय’
मेहेरगाव, ता. धुळे, जि. धुळे.
