You are currently viewing स्मित वदना

स्मित वदना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

## *स्मित वदना* ##

 

स्मित वदना तू असशी मानिनी

दर्शन होई रोज *प्रभाती*

केस काळे *लक्ष* वेधती

मोहात पाडते *हसरी मूर्ती*

 

धुके बाजूला घेरून बसता

असूया त्याची वाटू लागते

रेंगाळत रहाते तुज बाजुला

मनात येथे *गडबड* होते

 

मैत्री दिनाच्या या प्रसंगाला

फक्त लिहीतोय ओळी चार

असून अंतर *चार* तासांचे

होई भेटीची इच्छा अनिवार

 

असून दूर तरी जवळ भासते

छबी हसतमुखी मनी ठसते

भाग्यवान आपण व्यक्त होतो

कविता आपला *सेतू* ठरते

 

रूबाबदार ती *छबी* तुझी

लेखणीस मज उगा छळते

ओळी चार प्रसवून थांबते

बेचैन मैत्र मात्र मनी फुलते

 

लिहीत रहा तू रोज निराळी

भुरळ घालणारी *चारोळी*

स्फूर्ती देते ती रचण्यासाठी

रोज रोज *कविता* वेगळी

 

विनायक जोशी 🥳ठाणे

मीनलध्वनी/९३२४३२४१५७

४०१/रविवार/३० जुलै २०२३

प्रतिक्रिया व्यक्त करा