You are currently viewing आजोबांचे कपाट ! ब्रॅण्डी झाकणभर

आजोबांचे कपाट ! ब्रॅण्डी झाकणभर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आजोबांचे कपाट ! ब्रॅण्डी झाकणभर*

बालपणीच आम्ही मद्यपी झालो
ही तर आमच्या आजोबांची देणगी
अंग भिजून! गारठ्यानं वाजू लागलं की
लाल मधुर पेयाची !लाभायची बिदागी

आजीच्या बटव्यातून वेळोवेळी तिची
चित्रविचित्र औषधे बाहेर पडायची
आजोबांच्या बंद कपाटातून जादुई
जालीम !ब्रॅण्डीची बाटली निघायची

रांगेत उभे राहत!जादुई बाटली बघायचो
आजोबांबरोबर जल्लोष करायचो
थंडी आमच्या गलक्यांने पळून जायची
दोन झाकणं ब्रॅण्डीची हळूवार गिळायचो

अलगद रेशमी उबदार आजीच्या मिठीत
ब्रॅण्डी!ओठावर घोळवत झोपायचो
सर्दी पडस तापाची नाटक करीत आम्ही
आजोबांच्या बंद कपाटाकडे बघायचो

आता लेप लावायला आजी नाही
ब्रॅण्डीची झाकणं द्यायला आजोबा नाही
आठवणी कधीतरी !उघड्या होतात
उरातल्या सर्दीत!विझण्या ब्रॅण्डीही नाही

गारठा आजही !काल होताअगदी तसाच
पण ती उबदार माणसं राहिली नाही
ब्रॅण्डीच्या बाटलीचं !झाकणं भरून दारू
मायेने पाजणारा !हातही उरला नाही

बाबा ठाकूर धन्यवाद

*संवाद मीडिया*

*महा एक्सचेंज महोत्सव*
आपल्या कार चे वय वाढत आहे..
हाच सर्वोत्तम महिना आहे..
आपल्या जुन्या कारच्या सर्वोत्तम व्हॅल्युएशन चा..
आजच आपली जुनी कार एक्सचेंज करा आणि टाटा कार फॅमिली चे सदस्य बना..

आपल्या कार चे व्हॅल्युएशन हेच आपले डाऊन पेमेंट..ते देखील ८.३०% इतक्या कमी व्याज दर मध्ये..

*संपुर्ण स्वदेशी अभियान*

आजच भेट द्या अथवा कॉल करा

*एस. पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118611/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा