You are currently viewing १७ सप्टेंबरला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा ॲथलेटिक स्पर्धा

१७ सप्टेंबरला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा ॲथलेटिक स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी:

 

सिंधुदुर्ग ॲमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनतर्फे जिल्हा ॲथलेटिक स्पर्धा सिंधुदुर्गनगरी – ओरोस येथील क्रीडांगणावर १७ सप्टेंबरला आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन असोसिएशनच्या सचिव कल्पना तेंडोलकर आणि अध्यक्ष रणजितसिंह राणे यांनी केले आहे.

या स्पर्धा १४, १६, १८, २० आणि खुल्या गटातून घेण्यात येतील. स्पर्धा १७ सप्टेंबर रोजी घेण्यात येतील. त्यानंतर १४ ब १६ वयोगटातील राज्य स्पर्धा २९ आणि ३० सप्टेंबर २०२३ रोजी डेरवण- रत्नागिरी येथे होतील. तर १८, २० आणि खुल्या गटातील स्पर्धा ४ व ५ ऑक्टोबर रोजी मीनाताई ठाकरे स्टेडियम, नाशिक येथे होतील. जिल्हा स्पर्धेतून नियमानुसार खेळाडूंची निवड करण्यात येईल व संघ राज्य स्पर्धेसाठी पाठविला जाईल, असे कळविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − 1 =