You are currently viewing खलिफा उस्ताद अमीर हुसेन खां साहेब यांच्या ५२ व्या बरसी निमित्त श्रद्धांजली अर्पण

खलिफा उस्ताद अमीर हुसेन खां साहेब यांच्या ५२ व्या बरसी निमित्त श्रद्धांजली अर्पण

कुडाळ-आंदुर्ले पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या निवासस्थानी संगीत कार्यशाळेचे आयोजन

कुडाळ

खलिफा उस्ताद अमीर हुसेन खां साहेब यांच्या ५२ व्या बरसी निमित्त कुडाळ-आंदुर्ले पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या निवासस्थानी संगीत कार्यशाळेचे आयोजन करून खां साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फरुखाबाद घराण्याचे खलिफा महान तबला वादक उस्ताद अमीर हुसेन खां साहेब यांच्या ५२ व्या बरसी चे औचित्य साधून आंदुर्ले कुडाळ येथे ५ जानेवारी २०२१ रोजी श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या वतीने संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश, सरस्वती, नटराज पूजन तसेच गुरुप्रतिमेचे पूजन करून झाली त्यानंतर दीपप्रज्वलन विद्यालयाचे संचालक भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर, डॉ.श्री दादा परब तसेच आंदुर्ले गावच्या सरपंच महोदया सौ. पूजा सर्वेकर, सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, आंदुर्ले ग्रामोत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, लोककला संस्कृती प्राचार्य डॉ. रामचंद्र भर्तृ, प्रसिद्ध निवेदक  राजा सामंत,पखवाज अलंकार प्रशिक्षक श्री महेश सावंत आणि श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे सर्व तबला/पखवाज वादक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते झाले, या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजक तसेच श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार  महेश सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला. सर्वाना विद्यालयाच्या वतीने मानपत्र प्रदान करण्यात आली तसेच विशेष म्हणून संगीत गायक तसेच ॲड. दिलीप ठाकूर(मालवण), उत्तम पालव (आणावं), संगीतकार  सूर्या नाईक (गोवा), महेश पांगे (पोलीस दल,ओरोस), पखवाज वादक अरुण मांजरेकर (मुंबई),भजनी बुवा श्री दीपक खरुडे (मांडकुली), कु.अमित उमळकर(कुडाळ),  हरिश्चंद्र राणे,  संदीप केरवडेकर, भूषण देसाई तसेच आदरणीय  दिनेश जठार साहेब (लांजा-रत्नागिरी), चंद्रकिसन मोर्ये,  धोंडी शिरपुटे,  प्रताप वेंगुर्लेकर, आनंद सावंत, हरी परब (भोईचे केरवडे) सौ.श्री अतुल गवस, इत्यादी गुणिजनाचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सकाळच्या सत्रातील संगीत कार्यक्रमाची सुरुवात युवा गायिका कु. कशीष खडपकर(कवठी) हिच्या मधुर भक्तीगीताने झाली. या एकदिवसीय संगीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते ते कोल्हापूर हुन खास आलेले स्व.पं. गोविंद माजगावकर,पं. अमोद दंडगे, स्व.पं. अरविंद मुळगावकरजी यांचे शिष्य संगीताचार्य  सचिन कचोटे जी यांचे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर, संगीताचार्य सचिन कचोटे यांनी सकाळच्या सत्रामध्ये पखवाज/तबला उपस्थित विद्यार्थ्यांना वादनातील सूक्ष्म विचार, रियाज याविषयी खासकरून मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले, या शिबिरात साधारण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यालयाचे पखवाज विशारद  दत्तप्रसाद खडपकर, सचिन कातवणकर तसेच कु.अतुल उमळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पखवाज विषयी बहुमोल मार्गदर्शन केले.

यानंतर पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक पखवाज करताना तालपर्व भाग ४ मध्ये एक अप्रचलीत ताल शँकर मात्रा ११ या तालात सामूहिक पखवाज वादन करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले, कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात कोल्हापूर हुन आलेले संगीताचार्य श्री सचिन कचोटे यांचे एकल तबला वादन सादर झाले त्यांनी तबल्यावर तिनताल सादर करताना खासकरुन खां साहेब यांच्या रचित परंपरागत बंदिशी यांच्या सौंदर्यपूर्ण रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली, खां साहेबांच्या बंदिशी सादर करताना संपूर्ण श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाला होता त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य श्री धनंजय सावंत(तबला विशारद)यांनीसुद्धा आपल्या वादनातून उपस्थितांची दाद मिळविली,वादनाचा समारोप करताना खां साहेब द्वारा रचित सर्वात पहिली बंदिश तिनताल मिश्रजाती गत या गतीने समारोप करताना खां साहेब यांना वंदन केले व आपली सेवा खां साहेबांच्या चरणावर अर्पण केली,त्यांना संपूर्ण लेहरा हार्मोनियम साथ कु.अमित उमळकर(कुडाळ)यांनी यशस्वी रित्या केली,संपूर्ण कार्यक्रमाची समाप्ती भजन गायक बुवा कु.अमित उमळकर यांच्या भजनाला उपस्थित श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या पखवाज वादकांनी सामूहिकपणे यशस्वी साथसंगत केली या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक श्री राजा सामंत(नेरूर)यांनी आपल्या शब्दसौदर्यानी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली,ध्वनिव्यवस्था कु.ओमकार वेंगुर्लेकर यांनी उत्तम संयोजन केली,श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ यांच्या वतीने संगीताचार्य श्री सचिन कचोटे याना खां साहेब यांच्या बरसी निमित्त विशेष मानपत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच त्यांच्याबरोबर बुजुर्ग तबला वादक श्री महेश पाटील गुरुजी(इचलकरंजी) यांचा सुद्धा विशेष गौरव व सन्मान करण्यात आला,संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक, प्रशिक्षक,पालकवर्ग,तसेच तबला/पखवाज साधकांनी यशस्वीरित्या पार पाडून खलिफा उस्ताद अमीर हुसेन खां साहेबांना मनपूर्वक मानवंदना दिली,याबद्दल विद्यालयाचे प्रशिक्षक श्री महेश सावंत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले,अशाप्रकारे कार्यक्रम सादर करून उस्ताद अमीर हुसेन खां साहेबांना संगीतमय श्रद्धांजली अर्पण करण्यात श्री जगन्नाथ संगीत विद्यालय यांचे हे दुसरे वर्ष सुद्धा यशस्वीपणे पार पडले.

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय,पखवाज अलंकार प्रशिक्षक श्री महेश विठ्ठल सावंत, कुडाळ,आंदुर्ल

मो.9420307336/8805891575

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =