You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात २१ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

वैभववाडी महाविद्यालयात २१ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन..

वैभववाडी

येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचालित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २१ रोजी सकाळी ठिक १०.३० वा. महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि वैभववाडीतील तरुणांनी सहभागी घेऊन हे रक्तदान शिबिर यशस्वी करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.दर्शना कोरगावकर, एन.सी.सी. विभाग प्रमुख रमेश काशेट्टी आणि आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख प्रा. पी.एम. ढेरे यांनी केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 1 =