You are currently viewing माझे कृष्णाई

माझे कृष्णाई

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरविंदजी ढवळीकर यांची भक्तीपूर्ण काव्यरचना

वाट पंढरीची मळली l कान्होपात्रेच्या पाऊली
संगे माय ही चालली l भूक भक्तीची लागली

लागे दर्शनाची आसं l डोळे बांधले पायास
उन्हातान्हाचा प्रवास l परी गारवा जिवास

खेळ नियतीचा चाले l छत्र मायेचे बुडाले
कान्होपात्रे लागी उरले l एक माहेर सावळे

चाले एकटी एकटी l येई चन्द्रभागे तटी
डोळा पाहे जगजेठी l भासे जणू माय भेटी

दाटे अंतरी उमाळा l प्राण होय कंठी गोळा
कां रे लाविलासी लळा l जन्मभरीचा सोहळा

कान्होपात्रा धाव घेई l गर्जे विठाई विठाई
माझे पंढरीचे आई l माझे कान्हाई कृष्णाई

अरविंद
10/6/21

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 17 =