You are currently viewing तिची आठवण….

तिची आठवण….

तिची आठवण,
जेव्हा जेव्हा यायची.
मनात काहूर माजायचं,
अंगाची लाही लाही व्हायची.

रोज तिची वाट पहायचो,
दिवसभर उन्हाचे चटके लागताच,
तिची कमी जाणवायची.
तिच्या भेटीसाठी उतावीळ व्हायचो.

आणि,

आज अचानक ती आली,
तिचा तो हळुवार गुलाबी स्पर्श,
मनाला गुदगुल्या करून गेला.
क्षणभर अंगावर,
काटाच उभा राहिला.

तिच्या नाजूक स्पर्शाने,
माझं अंग अंग शहारलं.
आत्ता कुठे समजलं,,,,
थंडीच्या मौसमात…
थंडी किती गरजेची आहे ती.

(दिपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 6 =