पत्रपरिषदेत शिवपुरे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
मराठवाडा युवक विकास मंडळाची स्व. प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला यंदा २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. रविवार, दि. १ ते मंगळवार ३ नोव्हेंबरदरम्यान या व्याख्यानमालेत ‘युवकांची भूमिका’, ‘मराठवाड्याचा दुष्काळ’ आणि ‘नव्या भारतापुढील आव्हाने’ या विषयांवर विचारमंथन होणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे यांनी बुधवारी, २८ रोजी पत्रपरिषदेत दिली. गेल्या २६ वर्षांत या व्यासपीठावर नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे, राम माधव, विनय सहस्रबुद्धे, दत्तात्रेय होसबळे, डॉ. सुब्रमण्यम स्वामी, उज्वल निकम, तरुण विजय, विवेक घैसासी आणि प्रशांत हरतालकर यांसारख्या तज्ज्ञांनी विचार मांडले असल्याचे ते म्हणाले.
रेल्वेस्टेशन रोडवरील भानुदास चव्हाण सभागृहात रविवार, १ नोव्हेंबर रोजी बदलते विश्व, बदलता भारत : युवकांची भूमिका (जेन झी) या विषयावर ज्येष्ठ पत्रकार विलास बडे यांचे व्याख्यान होईल. सोमवार, २ नोव्हेंबर रोजी ‘मराठवाड्याचा दुष्काळ व शिरपूर पॅटर्न’ या विषयावर भूजलशास्त्रज्ञ सुरेश खानापूरकर मार्गदर्शन करतील. मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी ‘नये भारत का उदय और षड्यंत्रों का चक्रव्यूह’ या विषयावर राजकीय विश्लेषक हर्षवर्धन त्रिपाठी यांचे व्याख्यान होईल.
विद्यार्थी, युवक, अभ्यासक आणि नागरिकांनी या वैचारिक पर्वात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे व सचिव ॲड. अरविंद केंद्रे यांनी केले आहे. यावेळी मंडळाचे सचिव ॲड. अरविंद केंद्रे, प्रचार प्रमुख प्रा. नामदेव कराड, धनंजय ब्रम्हपूरकर, प्रा. मनोहर बन्सवाल, तृप्ती पालोदकर आदी उपस्थित होते.
विषय व वक्ते
रविवार, १ नोव्हेंबर बदलते विश्व, बदलता भारत : युवकांची (जेन-झी) भूमिका ज्येष्ठ पत्रकार विलास बड/अध्यक्ष : धनंजय आकात
सोमवार, २ नोव्हेंबर मराठवाड्याचा दुष्काळ व शिरपूर पॅटर्न- सुरेश खानापूरकर अध्यक्ष : रमेश पांडव
मंगळवार, ३ नोव्हेंबर नये भारत का उदय और षड्यंत्रों का चक्रव्यूह – हर्षवर्धन त्रिपाठी; अध्यक्ष : बबनराव जगाडे वेळ : दररोज सायंकाळी ६.३० वाजता.
